शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण प्रशिक्षक मानधनाविना !

By admin | Updated: November 3, 2016 02:35 IST

शेतकरी, महिला, युवक, अपंग, पोलीस पाटील आदिंना प्रशिक्षण देण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातील १२४ गणांतील प्रवीण प्रशिक्षकांना त्यांचे मानधन तीन महिने झाले तरी देण्यात आले नाही.

अलिबाग : केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या बळकटीकरणासाठी पंचायत समितीच्या गणस्तरावरील निवडलेल्या प्रवीण प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्राम संसाधन गटातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय शासकीय कर्मचारी, स्वयंसहाय्यता गटाचे सदस्य, शेतकरी, महिला, युवक, अपंग, पोलीस पाटील आदिंना प्रशिक्षण देण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातील १२४ गणांतील प्रवीण प्रशिक्षकांना त्यांचे मानधन तीन महिने झाले तरी देण्यात आले नाही. यामुळे या सर्व प्रवीण प्रशिक्षकांची दिवाळी मानधनाविना काळी ठरली आहे. दिवाळी झाली आता तरी मानधन अदा करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन या १२४ पैकी एक प्रवीण शिक्षक प्रशांत पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर आणि ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी यांच्या कार्यालयात दिले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर हे एका शासकीय बैठकीकरिता खालापूरला गेले असल्याने त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितल्याप्रमाणे निवेदन कार्यालयात दिले तर ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी हे दिवाळीच्या निमित्ताने रजेवर असल्याने त्यांच्या कार्यालयात निवेदन दिले असल्याची माहिती प्रवीण शिक्षक प्रशांत नारायण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडात केंद्र शासनाकडून, राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला बेसिक ग्रँट व परफॉर्मन्स ग्रँट अशा दोन प्रकारच्या ग्रँट्सच्या स्वरूपात अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. या प्रशिक्षकांना गणस्तरावरील एकदिवसीय प्रशिक्षणाकरिता १५०० रुपये तर ग्रामस्तरावरील ० ते ३ दिवसीय प्रशिक्षणास ४२०० रुपये मानधन देण्याचे शासनाने निश्चित केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>मानधन तातडीने द्यावे आता दिवाळीनंतर तरी या प्रावीण्य प्रशिक्षकांच्या मानधनाविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी गांभीर्याने दखल घेऊ न जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रवीण प्रशिक्षकांचे मानधन तातडीने द्यावे अशी मागणी सर्व प्रवीण प्रशिक्षकांची असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका प्रवीण शिक्षकाचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देय असलेले मानधन किमान ३० हजार रुपये आहे. त्याकरिता केंद्र सरकारकडून जिल्हा परिषदेस निधी देखील प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत मानधन अदा कारण्यात आले नाही याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रशिकांची निवड : वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीचा विनियोग व नियंत्रण अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निर्देशनानुसार ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवरून प्रशिक्षकांची निवड करुन, त्यांना या विषयाचे पुणे येथील यशदा या शासनाच्याच संस्थेने प्रशिक्षण दिले.प्रवीण शिक्षकांच्या मानधनाचा विषय जि.प.ग्रामपंचायत विभागाचा आहे. या विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी हे रजेवर आहेत. ते आल्यावर याबाबत नेमके काय ते समजू शकेल. - डॉ.अविनाश गोटे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद