शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत ठाकुरांचा अखेर राजीनामा विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा

By admin | Updated: September 13, 2014 04:56 IST

प्रस्तावित खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखेर शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला

पनवेल : प्रस्तावित खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखेर शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही आणि काँग्रेस पक्षातच राहून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल ब्रिगेडचे सदस्य आणि युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ठाकूर यांनी प्रस्तावित खारघर टोलनाक्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने खारघर येथे टोलनाका उभारला. पनवेल आणि सिडकोवासीयांना दिवसातून अनेकदा या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी काही महिन्यांपासून आमदार ठाकूर यांनी लावून धरली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. या समितीने अहवालही सादर केला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. आचारसंहितेआधी याबाबत निर्णय घ्या, असा आग्रह त्यांनी लावून धरला. मात्र कोणत्याही हालचाली होत नसल्याने ठाकूर यांनी शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला.