शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रणितीने कोणाशीही लग्न करावे, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 02:09 IST

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचे पडसाद समाजावर पडत असतात. त्यात तरुण आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत

- राजा माने, सोलापूर

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचे पडसाद समाजावर पडत असतात. त्यात तरुण आणि वलयांकित व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत तर तरुणाई जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. तशाच वलयाच्या धनी असलेल्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे! प्रणिती लग्न कधी करणार? त्यांचा जीवनसाथी कोण असेल? असे अनेक सवाल सोलापूरकर आणि राज्यातील त्यांना ओळखणाऱ्या तरुणाईमध्ये नेहमीच चर्चिले जातात. याच चर्चेला नव्याने वाट करून देण्याचे काम खुद्द प्रणितीच्या वडिलांनीच शनिवारी केले. असं म्हणतात की, कन्येचा विवाह हा प्रत्येक पित्याच्या जीवनातील कर्तव्यपूर्तीचा एक क्षण असतो. अशा कर्तव्याचे भान राखण्याला सुशीलकुमार शिंदेंसारखे नेते तरी कसे अपवाद ठरतील? ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी आज ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात सुशीलकुमारांशी संवाद साधताना सुशीलकुमारांवर प्रणितीच्या लग्नाचा अनाहूत बाऊन्सर टाकला! ‘सलमान खान कधी लग्न करणार? हा प्रश्न जसा नेहमीच चर्चेत असतो, तसाच प्रणिती शिंदे लग्न कधी करणार...’ असा सवाल खांडेकरांनी केला आणि पिता सुशीलकुमार बोलते झाले... ‘प्रणितीने कुणाशीही लग्न करावे, पण तो कमावता असावा, त्याने तिला सांभाळले पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे. मी प्रणितीला सांगितले आहे की, जात-पात या गोष्टी मी मानत नाही. तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. मी देखील प्रेमविवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे.’ मवाळ राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुशीलकुमारांंनी आपली कन्या प्रणिती मात्र आक्रमक असल्याचे आवर्जून सांगितले.