शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या २०० पायऱ्या चढउतार हाच सराव

By admin | Updated: August 11, 2015 23:48 IST

यशस्वी चढाई : कोल्हापूरच्या खुशीने केली दोन शिखरे सर

कोल्हापूर : हिमालयातील क्षितिधर शिखर सर करताना फारशी अशी तयारी केली नव्हती; फक्त एकच केले होते, दररोज शाळेच्या २०० पायऱ्यांवर पंधरा किलो ओझे घेऊन किमान पंधरा वेळेला चढउतार करीत होते, अशी प्रतिक्रिया चौदावर्षीय गिर्यारोहक खुशी विनोद कांबोज हिने व्यक्त केली. हिमालयातील १९ हजारांवरील हनुमान तिब्बा व १७ हजार २२४ फूट उंचीवरील क्षितिधर शिखरावर यशस्वी चढाई केल्यानंतर खुशी सोमवारी कोल्हापुरात आली. तिच्याशी संवाद साधल्यानंतर तिने गिर्यारोहणातील अनुभव ‘लोकमत’ला सांगितले. आमची ही मोहीम २२ दिवसांची होती. मोहिमेत दोन पथके सहभागी झाली होती. हनुमान तिब्बा हा ट्रेक १९ हजार ४६२ फुटांचा आहे, तर क्षितिधर मोहीम १७ हजार २२४ फुटांची होती. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रेकिंगचा अनुभव माझ्या पाठीशी होता; पण हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव नवा होता. याबाबत माझ्या वडिलांनी त्यांचा अनुभव मला सांगितला होता. यासाठी मी शाळेतील २०० पायऱ्या पंधरा किलो ओझे घेऊन दररोज चढत होते. बर्फाने आच्छादित असलेल्या परिसरात गिर्यारोहण करणे तितके सोपे नसल्याने आम्ही जुन्नरला जाऊन आवश्यक तयारी करून घेतली. त्यानंतर मुंबईला गेलो आणि तेथून मनालीला पोहोचलो. आमचा बेस कॅम्प बियास्कूनला होता. तेथील वातावरणाशी मिळतेजुळते घेण्यासाठी चार ते पाच दिवस बारा ते चौदा किलोमीटर चालण्याचा सराव केला. त्यानंतर २३ जुलै रोजी क्षितिधरकडे चढाई करण्याचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा एक समस्या निर्माण झाली. त्या मार्गावर अनेक अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे आम्हाला नियोजन बदलावे लागले. पूर्वीचे चढाईसाठी केलेले नियोजन व मार्ग वेगळा व आताचा मार्ग वेगळा व नवीन होता. हे आव्हान मोठे होते. मात्र, यावर मात करीत आम्ही अखेर ही चढाई २७ जुलै रोजी पूर्ण केली; तर २७ ते १ आॅगस्ट या काळात हनुमान तिब्बा सर करण्यात आला. खुशी म्हणाली, हनुमान तिब्बा सर केल्यानंतर खाली उतरताना हवामान बिघडले होते. त्यामुळे उतरताना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. तसेच रात्री जोरदार हिमवादळे निर्माण होत होती. या बिकट परिस्थितीत शिखर सर केल्याचा आनंद आहे. मुंबई येथील गिर्यारोहक मेहबूब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली मी ही मोहीम पार पाडली. माझ्यासोबत शिल्पा नायर व नितीन मोरे हे दोघे मुंबईचे, सुनील ठाकूर (मनाली) व दोन गाईड आमच्यासोबत होते; तर हनुुमान तिब्बाच्या मोहिमेत अमीर नदाफ (सातारा), भालचंद्र चौधरी (ठाणे) आणि तीन गाईड सहभागी झाले होते. खुशी कोल्हापूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून, ती नववीमध्ये शिकत आहे. (प्रतिनिधी)आता लक्ष्य लडाख!आता लडाख येथील नून आणि कुण ही २२०० हजार फुटांवरील शिखरे सर करण्यासाठी मी सराव करणार आहे. - खुशी कांबोज