शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वीज निर्मितीला कोळशाचे ग्रहण

By admin | Updated: November 25, 2014 00:50 IST

चंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात

चंद्रपूर कोळशाचा जिल्हा : मात्र वीज केंद्रालाच कोळसा मिळेना ! रवी जवळे -चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा राहायचा. मात्र अलिकडे या साठ्याला कोळसा खाणीचे ग्रहण लागले आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्याने कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. त्यामुळे चंद्रपूरजवळ ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले. दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे. कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणे अपेक्षित नाही. मात्र दुर्दैवाने या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते. या केंद्रात चार संच २१० मेगावॅट तर तीन संच ५०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. २१० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रिक टन कोळसा लागतो तर ५०० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज १२ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे ४५ ते ५० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे. पूर्वी सात दिवस पुरेल इतका साठा ‘इमर्जंसी’ म्हणून ठेवला जायचा. अलिकडे एवढा साठा कधीच राहत नाही. सध्या वीज केंद्रात दीड दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. रोज मागणीच्या तुलनेत कोळसा कमी येत असल्याने वीज निर्मितीवर आणि पर्यायाने राज्यातील वीज उपलब्धतेवर परिणाम होत आहे.