शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 24, 2016 03:02 IST

बांधकाम खात्याने सजगता न दाखविल्यामुळे खड्डे जैसे थे असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील रस्त्यांसंदर्भातील बांधकाम खात्याने सजगता न दाखविल्यामुळे खड्डे जैसे थे असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. गेले दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेऊन सुद्धा मुरुडच्या अभियंत्याकडून कोणतेही समाधानकारक काम होत नसल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.मुरुड तालुक्यातील आगरदांडा सावली, नांदले, खोकरी, खारआंबोली या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरचे खड्डे डांबर वापरून रोलरचा वापर करून बुजवावेत अशी मागणी होत आहे. खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. खड्डेविरहित चांगल्या दर्जाचे रस्ते नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर बंधन राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर बंधन आहे. असे असले तरी त्या संदर्भात अंमलबजावणी होताना दिसत नाही. पंधरा दिवसावर गणपती उत्सव आला तरी बांधकाम खात्याकडून रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे कोणतेही ठोस पावले उचलल्याचे दिसले नाही. आगरदांडा या रस्त्यापासून ते मिठागरपर्यंत रस्ते नव्हे तर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले दिसून येते. या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास मुरुड तालुक्यातील अभियंता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून के ला जात आहे. गणपती येण्याआधी आगरदांडा ते मिठागरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यासाठी अनेक नागरिकांनी कित्येक वेळा निवेदन दिले, मात्र या रस्त्याकडे बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावर खड्डेमुक्त रस्ते कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)>नागरिकांचा आंदोलनाचा इशारानांदगाव/ मुरु ड : मुरु ड तालुक्यातील सर्वात जास्त खड्डे आगरदांडा, सावली, नांदले, खारआंबोली या भागात पडलेले असून सुद्धा बांधकाम खाते या भागासाठी कोणतेच प्रयत्न करताना आढळून येत नाही. गणपती उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची जबाबदारी असून सुद्धा येथे खड्डे न बुजविल्याने नागरिकांनी राग व्यक्त करून आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे किरकोळ अपघात सुद्धा झाले आहेत. तर एक महिला प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असताना विक्र म रिक्षातच तिची प्रसूती झाली. अशा अनेक संकटांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहेत.