शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमन नव्हे, एजंटदादा पोहोचवणार ‘टपाल’

By admin | Updated: March 10, 2017 05:05 IST

पत्र, मनीआॅर्डर, पार्सल अशा विविध सेवा देणारे खाकीतील पोस्टमनकाका म्हणजे टपाल विभागाची जीवनवाहिनीच आहे. नागरिक आणि टपाल विभागातील एक जिव्हाळ्याचा दुवा

- विशाल शिर्के,  पुणे

पत्र, मनीआॅर्डर, पार्सल अशा विविध सेवा देणारे खाकीतील पोस्टमनकाका म्हणजे टपाल विभागाची जीवनवाहिनीच आहे. नागरिक आणि टपाल विभागातील एक जिव्हाळ्याचा दुवा म्हणूनच या काकांकडे पाहिले जाते. काळाच्या ओघात आता या कामाची सेवादेखील आऊटसोर्सिंग पद्धतीप्रमाणे केली जाणार आहे. कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या या एजंटदादांकडून पुण्यात प्रथमच अशी सेवा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशात १ एप्रिल १८५४ रोजी टपाल सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून देशाच्या कानाकोपऱ्यात संदेशाचे वहन करण्यात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्मार्ट मोबाईल, इंटरनेट अशा वेगवान संदेशवहनाच्या काळात टपाल खात्याने महत्त्व टिकवून ठेवले आहे. टपाल विभागाने देखील आपल्या सेवेत अमूलाग्र बदल केला असून, पद्धतीदेखील बदलल्या आहेत.अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत शहरी भागातही पोस्टमनकाकांचा प्रत्येक घराशी जिव्हाळ्याचा संबंध असायचा. एखाद्या व्यक्तीने आपल्या आप्ताचा पत्ता काहीसा अपुरा दिला, तरी ते पत्र नक्की संबंधितापर्यंत पोहोचणार, अशी पोस्टमनकाकांची ख्याती आजही टिकून आहे. इतर सरकारी विभागांप्रमाणे येथेही नवीन पदांच्या भरती प्रक्रियेसाठी विलंब लागतो.यापूर्वी शहरात वाहतूक नियोजनासाठी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ म्हणून कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली आहे. विविध सरकारी-निमसरकारी कार्यालयांतही कामकाजासाठी कंत्राटी कामगारांवर भिस्त ठेवण्यात येत आहे. त्यात आता टपाल सेवेचीदेखील भर पडणार आहे.

- 496 पुणे शहरात सध्या कार्यरत पोस्टमन

- 44 शहरातील महिला पोस्टमन

- जवळपास १५ ते २० टक्के पोस्टमनची पदे रिक्त आहेत. परिणामी, सध्याच्या उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा ताण येत असल्याने पोस्टमनचे काम करण्यासाठी २० ते २२ डिलिव्हरी एजंटांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या महिनाभरात ती पूर्ण होईल. त्यानंतर निवड झालेल्या एजंटांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्यावर टपाल वितरणाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.पोस्टमन पदाच्या अनेक जागा रिक्त असल्याने, सध्याच्या मुष्यबळावर ताण येत होता. त्यामुळे पोस्टमनच्या कामासाठी पहिल्यांदाच डिलिव्हरी एजंटांची नेमणूक करण्यात येत आहे. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. गरजेप्रमाणे सेवेच्या कालावधीत वाढही केली जाऊ शकते. -गणेश सावळेश्वरकर, पोस्टमास्तर जनरल, पुणे विभाग