शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसीआरबाबत’ची चालढकल महागात पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 05:26 IST

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालाचे (एसीआर) कामे प्रलंबित ठेवणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे.

जमीर काझी,मुंबई- आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक गोपनीय अहवालाचे (एसीआर) कामे प्रलंबित ठेवणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे. एसीआरबाबतचे काम ३० एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण न केल्यास, त्यांना यंदाच्या वार्षिक वेतनवाढीवर गंडातर येणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्याबाबत सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व घटकप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. ‘एसीआर’च्या कार्यपूर्ती केल्याबाबतचा अहवाल प्रत्येक घटकाने निर्धारित मुदतीमध्ये पोलीस मुख्यालयाला पाठवायाचा आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणे पोलीस दलातही कॉन्स्टेबलपासून ते महासंचालक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यासाठी ‘एसीआर’ महत्त्वाचा ठरतो. पदोन्नती, सेवा पदकासाठी, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती करताना, त्यांच्या ‘सर्व्हिस बुका’तील शेरा अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी एसीआरबाबत दक्ष असतात. तथापि, अनेक वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांचे गोपनीय अहवाल लिहिण्याच्या कामाकडे वेळेचे कारण सांगत, दुर्लक्ष करतात. पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांच्या याबाबतच्या व्यथा लक्षात आल्याने, पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने घालून दिलेल्या निर्देशांची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, प्रत्येक अंमलदार, अधिकाऱ्यांचे एसीआर लिहिण्याचे काम (प्रतिवेदन) १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याबाबत त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पुनर्विलोकनासाठी अहवाल पाठवणे आवश्यक असते. त्यांच्याकडून हे काम ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून संस्करण अधिकाऱ्यांकडे पाठवणे निकडीचे आहे. या कामात दिरंगाई करणाऱ्यांना १ जुलैपासून वार्षिक वेतनवाढ रोखली जाणार आहे. त्याबाबत कोणत्याही परिस्थितीत व त्यामुळे या वर्षापासून एसीआर वेळेत पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.>संबंधितांची वार्षिक वेतनवाढ रोखणारप्रत्येक अंंमलदार, अधिकाऱ्यांसाठी एसीआर वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठांकडून त्याबाबतचे काम प्रलंबित राहिल्याने, त्यांना अनेक संधी गमवाव्या लागतात. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत एसीआरचे काम १०० टक्के पूर्ण न केल्यास संबंधितांची वार्षिक वेतनवाढ रोखली जाईल. - सतीश माथुर, पोलीस महासंचालक