शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकांवर पोर्टलची नजर

By admin | Updated: March 30, 2017 03:29 IST

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमधील अनेक मूलभूत सुविधा महापालिकेत न जाता

मुंबई : राज्यातील महापालिका व नगरपालिकांमधील अनेक मूलभूत सुविधा महापालिकेत न जाता आॅनलाइन उपलब्ध करून घेता येतील. तसेच या दोन्ही ठिकाणी कारभार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. वर्षानुवर्षे विकास आराखडे रखडल्यामुळे लहानमोठ्या शहरांमध्ये अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामांना उत्तेजन मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. राज्यातील सर्व प्रमुख शहरांचे तसेच १९८ छोट्या शहरांचे विकास आराखडे लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महापालिका, नगरपालिकांच्या कारभाराची इत्थंभूत माहिती स्वतंत्र पोर्टलवर असेल आणि ती जनतेलाही पाहता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नगरविकास विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अतिक्रमणे व बेकायदेशीर विकासाला बिल्डर व इतर मंडळींसोबतच या शहरांचे विकास आराखडे वेळेत न करणारे सरकारही काही प्रमाणात जबाबदार आहे.त्यामुळे आपले सरकार आल्यानंतर वर्षानुवर्षे प्रलंबित ८२ विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. १९८ छोट्या शहरांचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांचा विभागीय विकास आराखडाच तयार नव्हता. तोदेखील तयार करण्यात आला असून, हरकती सूचना मागवून १५ आॅगस्टपूर्वी मंजुरी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नव्याने १२३ नगरपंचायती करण्यात आल्या आहेत. या नगरपंचायतींना मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ८ हजार कोटी रुपयांचे १४० प्रकल्प प्रलंबित होते. ते येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. ३ हजार कोटी रुपयांचा निधी देऊन त्यातील ५० प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या २ आॅक्टोबर २०१७पर्यंत सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)