शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पानसोलीत रिंगरोडची पाहणी

By admin | Updated: May 21, 2016 01:41 IST

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पानसोली गावातील रिंगरोड बदलण्याचा घाट’ या वृत्ताची दखल घेत तहसीलदार व जलसंपदा विभागाकडून रिंगरोडची पाहणी करण्यात आली

वडगाव मावळ : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पानसोली गावातील रिंगरोड बदलण्याचा घाट’ या वृत्ताची दखल घेत तहसीलदार व जलसंपदा विभागाकडून रिंगरोडची पाहणी करण्यात आली. पानसोली येथील पवना धरणग्रस्तांसाठी शासनाने सन १९७०ला मंजूर केलेला रिंगरोड बदलून दुसऱ्या बाजूने वळविण्याचा घाट धनदांडगांनी घातला आहे. जुना रस्ता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार, वनविभाग व पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते.शासनाने पवना धरणाच्या काठावर वसलेल्या गावांसाठी रिंगरोड तयार केला आहे. परिसरातील गावे या रिंगरोडने दळणवळण करत असतात. पण पानसोलीत एका उद्योजकाने रिंगरोड बदलण्याचा घाट घातला आहे. याबाबत ग्रामस्थ व पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने नवीन रस्ता बंद करून शासनाने खर्च केलेला रस्ता ग्रामस्थांना वापरण्यास द्यावा, या मागणीचे निवेदन संबंधित विभागाला दिले होते. तहसीलदार शरद पाटील, मंडलाधिकारी बाबूराव माने, शाखा अभियंता व्ही. एन. पागे, पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, उपाध्यक्ष दशरथ शिर्के, उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, वसंत तुपे, गोविंद घाडगे, विठ्ठल घाडगे यांच्यासह धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांसह गावात पाहणी केली. (वार्ताहर)>तहसीलदार पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी, संबंधित जागेचे मालक, धरणग्रस्त शेतकरी व केवरे, पानसोली, कोळे-चाफेसर येथील ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक जागामालक या वेळी उपस्थित होता. उर्वरित जागामालकांचे प्रतिनिधी या चर्चेसाठी उपस्थित होते.तहसीलदार पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी, संबंधित जागेचे मालक, धरणग्रस्त शेतकरी व केवरे, पानसोली, कोळे-चाफेसर येथील ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक जागामालक या वेळी उपस्थित होता. उर्वरित जागामालकांचे प्रतिनिधी या चर्चेसाठी उपस्थित होते.>कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर म्हणाले की, शासनाने रिंगरोडसाठी खर्च केला आहे. येथील जुना, बंद केलेला रस्ता लवकर दळणवळणासाठी खुला करावा. या परिसरातील ग्रामस्थांना हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेली लाँच सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून लवकर रस्ता सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात.