शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘पानसरेंचा खून करणारी विचारधारा सत्तेवर’

By admin | Updated: November 23, 2015 02:39 IST

‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.

कोल्हार (अहमदनगर) : ‘गेल्या काही दिवसांत देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले आहे. देशभर जाणीवपूर्वक असहिष्णुतेचे वातावरण तयार करून धार्मिक उन्माद माजविण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. ज्या विचारधारेने डॉ. गोविंद पानसरेंचा खून केला, तीच विचारधारा आज सत्तेवर आहे,’ असा घणाघाती आरोप गोविंद पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरे यांनी केला.पानसरे, कलबुर्गी व दाभोलकर यांच्या हत्या होऊनही आरोपी मोकाट आहेत. याबाबत सरकारला जाग यावी, म्हणून पानसरेंची जन्मभूमी कोल्हार (ता. राहाता) ते कर्मभूमी कोल्हापूर अशा समता संघर्ष यात्रेला रविवारी कोल्हारमधून प्रारंभ झाला. त्या वेळी पानसरे बोलत होत्या. भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, अंनिसचे जिल्हाध्यक्ष अरुण कडू, माजी सरपंच डॉ. संजय खर्डे, सुरेश पानसरे आदी या वेळी उपस्थित होते.स्मिता म्हणाल्या की, ‘सत्तेवर असणारे सरकार आम्हाला न्याय देईल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. सध्या देशात जातीयवादी संघटना असहिष्णुतेचा माहोल तयार करीत आहेत. त्यांनी मोदींचा चेहरा पुढे करून सत्ता हस्तगत केली आणि देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे झुकला. या विरोधात सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन पानसरे, दाभोलकरांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, कोल्हारमधून सुरू झालेली ही यात्रा राहुरी, नगर, पारनेर, राळेगणसिद्धी, शिरूर, लोणंद, सातारामार्गे २४ नोव्हेंबरला कोल्हापूरला पोहोचणार आहे. (वार्ताहर)