शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोळ यांची उच्चस्तरीय चौकशी

By admin | Updated: July 24, 2014 02:23 IST

अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक:यांच्या शोधासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’ केल्याच्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.

जमीर काझी - मुंबई
 मुंबई : अंधश्रद्धा निमरूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक:यांच्या शोधासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी ‘प्लँचेट’ केल्याच्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत अधिका:याची नियुक्ती केली जाईल. तथापि, तो महाराष्ट्र पोलीस सेवेबाहेरील असावा का, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
याप्रकरणी झालेले आरोप गंभीर असून त्याबाबत पुण्याच्या आयुक्तांकडून मंगळवीर आपल्याकडे पत्र प्राप्त झाले आहे. याविषयी उच्चस्तरीय अधिका:यांकडून तपासणी केली जाणार आहे. तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीसातील असावा की बाहेरील याबाबत चर्चा सुरू असून सर्व बाबींची विचार करून अधिका:याची नियुक्ती केली जाईल, असे दयाळ म्हणाले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 11 महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप त्याचा छडा लागलेला नाही.  याच पाश्र्वभूमीवर ‘प्लँचेट’ केल्याची कबुली पोळ यांनी पत्रकार आशीष खेतान यांच्याकडे दिल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’ बुधवारी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे चौकशीचे पाऊल उचलले आहे.
 
पोळ यांचे सत्ताधारी नेत्यांशी  चांगले संबंध असल्याने ‘प्लँचेट’च्या तटस्थ चौकशीसाठी बाहेरील अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी पुण्याचे आयुक्त सतीश माथूर यांनी महासंचालकांकडे केली असल्याचे सांगण्यात आले. 
प्लॅचेंट प्रकरणी संभाषणाची चित्रफित बिनबुडाची व खोटी आहे, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे तपासातून स्पष्ट होईल, असा दावा पोळ यांचे वकील प्रकाश मोरे यांनी केला.