शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पाच मतदारसंघातील मतदारयाद्या रद्द

By admin | Updated: September 19, 2016 04:50 IST

विधान परिषदांच्या पाच मतदारसंघातील मतदार याद्या रद्द करत नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले़

अण्णा नवथर,

अहमदनगर- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदांच्या पाच मतदारसंघातील मतदार याद्या रद्द करत नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले़ त्यामुळे नाशिक, अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका वेळेवर होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.विधान परिषदेचे सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ़ सुधीर तांबे, अमरावतीचे आ़ रणजित पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आ़ विक्रम काळे, नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आ़ नागो गणार, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ़ रामनाथ मोते यांची मुदत ५ डिसेंबरला संपत आहे़ त्यापूर्वी वरील पाच जागांसाठी निवडणुका होतील, असे गृहीत धरून प्रशासनाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली होती़ मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक, अमरावती (पदवीधर मतदारसंघ), औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील (शिक्षक मतदारसंघ) मतदार याद्या रद्द केल्या आहेत़ १ आॅक्टोबरपासून नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ तसा आदेश जिल्हा निवडणूक शाखेस शुक्रवारी प्राप्त झाला़ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे संकेत आहेत़आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, आंध्र, बिहार, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी लागू आहे़ मतदार यादीतील खोटे, स्थलांतरित, दुबार आणि मृत मतदारांचा शोध घेण्यासाठी आयोगाने २० कलमी कार्यक्रम जाहीर केला़ त्यानुसार नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघातील अशा मतदारांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांत प्रशासन केवळ २८ टक्के मतदारांपर्यंतच पोहोचू शकले. >नाशिक पदवीधरचे३ लाख मतदार बादनाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ लाख २७ हजार मतदारांची यादी तयार करण्यात आली होती़ ही यादी रद्द करण्यात आली असून, त्यामध्ये नगर जिल्ह्यातील १ लाख १२ हजार मतदारांचा समावेश आहे़ >पदवीधर मतदारसंघातील मतदार याद्यांबाबत नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत़ यासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांकडे सोमवारी बैठक आहे़ या बैठकीत याविषयी सूचना वरिष्ठांकडून दिल्या जातील़ त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल़- अनिल कवडे,जिल्हाधिकारी, अहमदनगर