शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये उगवत्या दिनकराच्या साक्षीने मतदानाला सुरूवात; चोख बंदोबस्त

By admin | Updated: February 21, 2017 09:18 IST

शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

अझहर शेख /आॅनलाइन लोकमत / नाशिक : शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. शहरासह उपनगरांमध्येही पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरापर्यंत कोणताही बुथ, किंवा दुकाने लावण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. नाशिककर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत उत्तम नाशिकसाठी महापालिके मध्ये नव्याने येत्या पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधींची निवड करताना दिसत आहे. पंधरवड्यापासून शहरात महापालिका निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला होता. प्रचारफेऱ्या, उमेदवारांच्या गाठीभेटी, नेत्यांच्या प्रचार सभा या सर्वांनी अवघे शहर जणू ढवळून निघाले होते. सर्वत्र ‘विजयी करा....विजयी करा...’ असाचा सूर कानी पडत होता; मात्र आदर्श आचारसंहितेनुसार रविवारी (दि.१९) संध्याकाळपासून प्रचाराचा हा सूर बंद पडला अन सारे शांत..शांत..झाले. मंगळवारी (दि.२१) मतदानाचा दिवस उजाडला आणि लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्यासाठी नागरिक सकाळी साडेसात वाजेपासून घराबाहेर पडले. शहरात आठवडाभरापासून वाढते तपमान लक्षात घेता वृध्द, महिला तसेच युवतींनी देखील सकाळी कोवळ्या उन्हात ‘फ्रेश’मूडमध्ये मतदानाला जाणे पसंत केले. यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी पहावयास मिळत होती. सर्वच मतदान केंद्रांभोवती चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी झळकविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मतदार ही माहिती वाचून केंद्रात प्रवेश करत आहेत. यामुळे यंदा नाशिक महापालिकेत सुशिक्षित, स्वच्छ लोकप्रतिनिधी निवडून जाण्याची आशा आहे.