शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पोळची कोल्हापूर जेलमध्ये रवानगी होणार

By admin | Updated: August 28, 2016 01:42 IST

सीरियल किलर संतोष पोळ याच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर (कळंबा) येथील ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये करण्यात

सातारा : सीरियल किलर संतोष पोळ याच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर (कळंबा) येथील ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये करण्यात येणार आहे. या ठिकाणी त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार असून, तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या देखरेखीत असणार आहे.पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. समाजामधून त्याच्यावर संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे तर काहींनी त्याला न्यायालयात नेताना चपलांचा हार घालू, असा इशारा दिल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांमध्ये त्याच्या कृत्यांबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे कारागृह अधीक्षक एन. एन. चोंधे यांनी खबरदारी म्हणून त्याला ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोळची साथीदार ज्योती मांढरे हिलाही कळंबा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सहा दिवस पोलीस कोठडी : संतोष पोळ याला सलमा शेख खूनप्रकरणी न्यायालयाने दि. १ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास त्याला पोलीस बंदोबस्तात वाई न्यायालयात हजर करण्यात आले. - पोळविरुद्ध सध्या समाजात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे त्याला सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूरला हलविले जाणार आहे.