शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वसाहतींंच्या दुरुस्तीला अखेर ‘मुहूर्त’

By admin | Updated: October 5, 2016 05:26 IST

मुंबईसह राज्यभरातील विविध २७ ठिकाणी पोलिसांच्या वसाहती व कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.

जमीर काझी , मुंबईमुंबईसह राज्यभरातील विविध २७ ठिकाणी पोलिसांच्या वसाहती व कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. त्यासाठी ६० कोटींचा निधी पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मंजुरी मिळालेल्या प्रलंबित प्रस्तावामध्ये मुंबई आयुक्तालयातर्गंत कुलाबा, मालाड, गोरेगाव आदीसह ८ ठिकाणांचा समावेश आहे. त्यासह राज्यातील अन्य १९ प्रकल्प पूर्ण निधी न मिळाल्याने अर्धवट अवस्थेत होती. आता संबंधित घटकांमध्ये त्याचे वितरण केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर राज्य पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रसामुग्री, प्रशिक्षणाबरोबरच पोलिसांच्या निवास व काम करीत असलेल्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून त्यासाठीचा निधी गेल्या आठ वर्षांत टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वसाहती व कार्यालयीन कामासाठी, इमारतीच्या सरंचनात्मक दुरुस्तीचे एकूण २७ ठिकाणांची कामे दोन वर्षांपूर्वी सुरू केली आहेत. त्यासाठीच्या प्रत्येक प्रकल्पांतर्गत अंदाजित खर्चापैकी ५० टक्के रक्कम गेल्या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेला आहे. मात्र, उर्वरित कामासाठी आवश्यक असलेला निधी न मिळाल्याने कामे प्रलंबित होती. त्याबाबतची मागणी राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे गृहविभागाकडे वारंवार केली जात होती. त्याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाला राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. मुंबई आयुक्तालयांतर्गंत क्वाटर्स व कार्यालयीन इमारत दुरुस्तीच्या कामासाठी १६ कोटी, तर राज्यातील अन्य पोलीस घटकांसाठी ३६ कोटींचा निधी ‘पोलीस हाउसिंग’कडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबईतील १६ कोटींच्या कामामध्ये कुलाबा, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली येथील वसाहती व कार्यालयीन इमारतीची दुरुस्ती तर सशस्त्र विभागाच्या (एल ए) वरळीतील पाइपलाइन, आयुक्तालयातील संरक्षण व सुरक्षा शाखेच्या कार्यालयातील दुरुस्ती, ताडदेव येथील पेटीट मिल इमारतीच्या परिसरातील पेव्हर ब्लॉक नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामाचा समावेश आहे.