शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पोलिसाचे हात तोडले

By admin | Updated: October 1, 2016 01:16 IST

कौटुंबिक वादातून काका, चुलतभाऊ आणि अन्य नातेवाइकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन्ही हात तोडल्याची

औरंगाबाद : कौटुंबिक वादातून काका, चुलतभाऊ आणि अन्य नातेवाइकांनी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचे दोन्ही हात तोडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री हर्सूल टोल नाक्याजवळ घडली. गंभीर जखमी असलेल्या पोलिसावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रकाश रामलाल बमणे असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याविषयी हर्सूल ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार म्हणाले, प्रकाश बमणे हे मंगळवारी रात्री हर्सूल रोडवरील ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर मोटारसायकलने घरी जात असताना हर्सूल टोलनाक्याजवळ दोन जणांनी त्यांना हात दाखवून थांबविले. यात त्यांचा एक चुलतभाऊ होता. त्यांना पाहून बमणे यांनी दुचाकी उभी करताच दोन दुचाकीवरून आलेल्या चार नातेवाइकांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तेथून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळाले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बमणे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यात प्रकाश यांचा उजवा हात खांद्यापासून तुटला असून डाव्या हाताची हाडे मोडली आहेत. पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)