शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाची दबंगगिरी

By admin | Updated: October 24, 2015 01:30 IST

पोलीस आयुक्तांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत असताना दुसरीकडे कर्मचारी मात्र अनेक वेळा उद्धट वर्तणूक करीत असल्याचे निदर्शनास

नवी मुंबई : पोलीस आयुक्तांपासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत अधिकारी नागरिकांशी सौजन्याने वागत असताना दुसरीकडे कर्मचारी मात्र अनेक वेळा उद्धट वर्तणूक करीत असल्याचे निदर्शनास येत असते. परिमंडळ एकचे उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याने किरकोळ कारणावरून चक्क भेटण्यासाठी येणाऱ्यांशी उद्धट वर्तणूक केल्याचा व मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे. नवी मुुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चारसूत्री कार्यक्रम ठरवून दिला आहे. यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, या सूचनेचाही समावेश आहे. स्वत: आयुक्त प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे व्यवस्थित ऐकूण घेतात. सर्वच उपायुक्त, साहाय्यक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागरिकांशी चांगले वर्तन करीत असताना पाहावयास मिळते. परंतु कनिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी अनेक वेळा उद्धटपणे वागत असल्याचे निदर्शनास येते. परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांच्या कार्यालयामध्ये जगदाळे नावाच्या कर्मचाऱ्याने उपायुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी उद्धट वर्तन केले. ओळख नसलेल्यांशी अरे-तुरेच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्तांच्या कार्यकाळाविषयी माहिती फलकावरील अधिकाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी छायाचित्र काढले असता संबंधिताने सदर व्यक्तीला दम देण्यास सुरुवात केली. उपायुक्तांच्या कार्यालयातच तुला येथेच मारेन, काय समजतोस मला, अशाप्रकारचे शब्द वापरण्यास सुरुवात केली. उपायुक्तांच्या दालनात जाऊन साहेब या व्यक्तीला मी फटके देईन, असे वक्तव्य केले. वास्तविक पोलीस कर्मचाऱ्यांना कोणालाही मारण्याची परवानगी नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केली तरी त्यालाही मारण्याची परवानगी कायद्यात नाही. तरीही उपायुक्त कार्यालयामध्येच कर्मचारी गुंडगिरीची भाषा वापरू लागले आहेत. वास्तविक जर कोणी नागरिकाने छायाचित्र काढले तर त्याविषयी रीतसर काही कारवाई असेल तर ती करता येऊ शकते. परंतु तसे न करता कायदा हातात घेण्याची भाषा वापरणाऱ्या या कर्मचाऱ्याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली जाणार आहे. (प्रतिनिधी)