शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा तपास पोलीस यंत्रणा करेल

By admin | Updated: May 10, 2015 00:00 IST

केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे

नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे. या कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी हस्तक्षेप करणार नाही; परंतु या प्रकरणात काही तरी शंकास्पद घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या साईचे महानिदेशक इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले. श्रीनिवास हे या घटनेची माहिती घेण्यासाठी अलपुझाला गेले होते. आपला अहवाल ते क्रीडामंत्र्यांना सादर करणार आहेत. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून ‘साई’च्या ४ अ‍ॅथलिटनी विषारी फळे खाल्ली होती. यात अपर्णा रामभद्रन हिचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर उपचार सुरू आहेत. त्यांंची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.श्रीनिवास म्हणाले, ‘‘काही तरी शंकास्पद घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे उत्तर कायदायंत्रणा देऊ शकेल. मी क्रीडामंत्र्यांच्या सूचनेवरून घटनेची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यावर काय करायचे, याचा निर्णय क्रीडामंत्री घेतील.’’श्रीनिवास पुढे म्हणाले, ‘‘अपर्णाची मृत्युपूर्व जबानी, प्रत्यक्ष आत्महत्येची घटना, इतर वाचलेल्या मुलींचे जबाब आणि साई सेंटरवरील इतर प्रशिक्षणार्थींचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. याबद्दल मी बोलू शकत नाही. ते आमचे नाही, तर पोलिसांचे काम आहे. या प्रकरणात अनेक चौकशी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, मानवाधिकार आयोग आदी गुंतले आहेत; त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही.’’