शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेरिफिकेशनसाठी पोलीस दारी

By admin | Updated: January 20, 2017 00:53 IST

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

पिंपरी : भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. कागदपत्राच्या काही जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन अर्ज दाखल करण्यापासून ते शुल्क भरण्याची व्यवस्था आहे. पोलिसांचा पडताळणी अहवाल मिळविण्यासाठी पूर्वी पोलीस ठाण्यांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता परिस्थिती उलट आहे. पासपोर्टकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी स्वत: पोलीसच जाऊ लागले आहेत. परदेशात पर्यटनासाठी, उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना पारपत्राची (पासपोर्ट) आवश्यकता भासते. पासपोर्ट काढण्यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुराव्यादाखल जोडावी लागणारी कागदपत्रे, विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली असून, जन्मदाखला नसेल, तर शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला जोडावा,अशी नव्या नियमावलीनुसार सवलत दिली आहे. एवढेच नव्हे, तर विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र जोडलेच पाहिजे,अशी सक्ती नाही. अशा प्रकारे काही नियम, अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन अर्ज, तसेच शुल्क सादर करून अपॉइंटमेंट घ्यायची. पारपत्र कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वेळेत जाऊन मूळ कागदपत्रे सादर करायची. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होणार. नंतर काही दिवसांत पोस्टामार्फत अर्जदाराला पासपोर्ट मिळतो, अशी ही प्रक्रिया आहे. ज्याला आयुष्यात कधीच पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली नाही, अशा लोकांनाही पासपोर्ट मिळविण्यासाठी पोलीस ‘व्हेरिफिकेशन’करिता पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत होत्या. आता चकरा थांबणार असून, पोलीसच पत्ता शोधत घरी येणार आहेत. (प्रतिनिधी)।पोलिसांना ‘जीपीएस’ची मदत...पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशनसाठी जाणा-या नागरिकांनाही काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागत होते. यापुढे व्हेरिफिकेशनसाठी स्वत: पोलीसच अर्जदाराच्या घरी जाणार आहेत. अर्जदाराचा पत्ता शोधण्याचे काम कठीण आहे. ते सुलभ व्हावे, यासाठी पोलीस मोबाइलमधील जीपीएस यंत्रणेचा वापर करून अर्जदाराचा पत्ता शोधू लागले आहेत. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीसच आपल्या दारी अशी परिस्थिती सध्या आहे.