गुन्ह्यात कलम ३०७ ची वाढ : आरोपीने स्वत:च्या मुलीवरही केला होता बलात्काराचा प्रयत्नवर्धा : पीडित चिमुकलीने आपल्या बयाणात ‘डाकू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वत:च्या काकाचेच नाव घेतले आहे. यानंतर पोलिसांनी ‘डाकू’ला अटक करण्यासाठी तीन पोलीस पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली. ‘डाकू’चे लोकेशनही मिळाले असून पोलीस लवकरच त्याच्या मुस्क्या आवळतील, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली.चिमुकलीचा पिता तिला एकटीला घरात ठेवून नातेवाईकाकडे विडीचा झुरका घेण्यासाठी गेला होता. ही संधी साधून डाकू तिथे आला. त्याने तिला उचलून घरापासून सुमारे अर्धा कि.मी. अंतरावरील महिलांच्या गोदरीवर नेले. काका असल्यामुळे ती सहज गेली. तिथे एका खड्ड्यात नेल्यानंतर त्याने आपले खरे रुप दाखवायला सुरुवात केली. चिमुकलीने पूर्ण ताकदीनिशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्या नराधमाने तिच्या शरीरावर ब्लेडने गंभीर जखमा केल्या. यात ती बेशुद्ध झाल्याने त्याच्यापुढे ‘त्या’ चिमुकलीचे काहीएक चालले नाही. आणि ती स्वत:च्या काकानेच केलेल्या अमानुष अत्याचाराचा बळी ठरली, अशी शक्यता पोलीस वर्तवित आहेत.चिमुकलीने बयाणात आपल्या काकाचेच नाव घेतल्यामुळे पोलीसही डाकूवर लक्ष केंद्रीत करुन आहेत. चिमुकलीच्या अंगावरील गंभीर जखमांमुळे तिच्या जिवाला धोका निर्माण झाला होता, असे वैद्यकीय अहवालात नमूद आहे. याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम ३०७ ची वाढ केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)पोलिसांचेही हृदय पाझरलेत्या तिन्ही चिमुकल्यांची तपास अधिकारी संतोष वानखेडे यांनी आस्थेने विचारपूस केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. ज्याने जन्माला घातले. त्याच्याकडूनच सुरक्षेची आशा बाळगता येत नसेल, तर या चिमुकल्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
‘डाकू’ला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना
By admin | Updated: August 27, 2014 00:54 IST