शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला धमकी देणारे दाम्पत्य अटकेत

By admin | Updated: December 22, 2015 02:32 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली. हे कऱ्हाड येथील दाम्पत्य आहे. सोमवारी त्यांना खडकी न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.दाभोलकर हत्येचा तपास थांबविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. चंद्रकांत दिनकर मोहिते (४१) आणि त्याची पत्नी संगीता (२५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांमध्ये घोडके यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरला त्यांना धमकीचा मेसेज आला. तपास थांबवावा, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर ९ डिसेंबरला त्यांना पुन्हा एकदा मेसेज आला. त्यामध्ये, तपास थांबवा, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच घोडके यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती.१७ डिसेंबरला खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाइल क्रमांकाच्या आधारे कारवाई करण्यात आली.