शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोळने आणखी खून केल्याचा पोलिसांना संशय

By admin | Updated: August 26, 2016 03:14 IST

सहा खून करणारा सिरियल किलर संतोष पोळने आणखी खून केल्याची शक्यता आहे.

वाई (जि. सातारा) : सहा खून करणारा सिरियल किलर संतोष पोळने आणखी खून केल्याची शक्यता आहे. तसेच आणखी सोने हस्तगत करणे, खुनासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करायची असल्याने पोळला कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी गुरुवारी वाई न्यायालयात केली. पोलिसांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोळला पुन्हा एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. तर ज्योती मांढरेला न्यायालयीन कोठडी सुनावली.मंगल जेधे खून प्रकरणात पोळला न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ त्याची तसेच ज्योती मांढरे हिची पोलीस कोठडी संपल्याने वाईच्या न्यायालयात दोघांनाही हजर करण्यात आले होते. दरम्यान, ज्योती मांढरेच्या सह्याद्रीनगरमधील घरात पोलिसांनी गुरुवारी झडती घेतली. यावेळी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. याची माहिती मात्र पोलिसांनी गोपनिय ठेवली आहे. (वार्ताहर)>मृतदेह उकरू नये, म्हणून कुत्र्यांनाही मारलेसंतोषने सुरेखा चिकणे यांच्या खुनानंतर पंधरा ते वीस कुत्र्यांना विष देऊन मारल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खून करून पुरलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून बाहेर काढू नये, यासाठी त्याने हे कृत्य केले होते, असे सांगितले जात आहे. कुत्र्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असाही प्रश्न विचारला जात आहे. तसेच मृतदेह उकरला जावू नये म्हणून कुत्र्यांना मारणाऱ्या संतोष पोळवर नवा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्राणीमित्रांमधून होत आहे.>वाईतही वकीलपत्र घेण्यास नकार सातारा जिल्हा बार असोसिएशनने संतोष पोळचे वकील पत्र घेण्यास नकार दिल्यानंतर वाई येथील वकिलांनीही हीच भूमिका घेतली आहे.