शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

नंदुरबारात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

By admin | Updated: September 6, 2016 20:19 IST

दोन मंडळामध्ये नाचण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 6 - गणपती मिरवणुकीत दोन मंडळामध्ये नाचण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत उपनिरीक्षकाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या तणावपूर्ण घटनांमुळे गणपती उत्सव शांततेत पार पाडवा यासाठी पोलीस प्रशासनान कंबर कसली आहे़ यासाठी ठिकठिकाणी सोमवारी पोलीस बंदोबस्त तैैनात करण्यात आला होता़ यातच मंगळ बाजारात जय हनुमान व्यायाम शाळेजवळ नाचण्याच्या क्षुल्लक कारणावरून जय हनुमान व्यायामशाळा आणि विर भगतसिंग मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

प्रसंगी त्याठिकाणी बंदोबस्ताकामी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक यादव सखाराम भदाणे हे दोन्ही गटातला वाद मिटविण्यासाठी गेले़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक भदाणे यांच्यासोबत संशयीत आरोपी विजय भिका मराठे उर्फ लल्ला, सचिन भिका मराठे आणि गणेश ईश्वर मराठे (रा. मंगळ बाजार परिसर मराठा गल्ली) यांनी हुज्जत घालत, शिवीगाळ करून मारहाण केली.

या घटनेनंतर सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत सोमवारी उपनिरीक्षक भदाणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़