शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या पत्नीला शिक्षा

By admin | Updated: October 22, 2014 06:06 IST

सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीच्या डोक्यात भांडणात हातोडा घालणाऱ्या पत्नीला सत्र न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ पार्वती असे या पत्नीचे नाव आहे़

मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीच्या डोक्यात भांडणात हातोडा घालणाऱ्या पत्नीला सत्र न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ पार्वती असे या पत्नीचे नाव आहे़ पार्वती हिने घटनेनंतर स्वत: पवई पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली होती़ मात्र अ‍ॅड़ अमित मुंडे यांनी पार्वतीचा पती नंदकिशोर तपसाळकर यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ ते ग्राह्य धरत सत्र न्यायाधीश डब्ल्यू़ डी़ देशपांडे यांनी पार्वतीला खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी सहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ ही घटना २८ एप्रिल २०१३ रोजी घडली़ मरोळ पोलीस कॅम्पमध्ये राहणारे नंदकिशोर यांचे पार्वतीसोबत भांडण झाले़ त्यावेळी पार्वतीने पोलिसांना फोन केला व त्याची दखल घेत पवई पोलिसांनी नंदकिशोर यांना ताब्यात घेतले़ काही वेळाने पोलिसांनी त्यांना सोडून दिले़ त्यानंतर पुन्हा नंदकिशोर व पार्वती यांच्यात भांडण झाले़ तेव्हा पार्वतीने नंदकिशोर यांच्या डोक्यात हातोडा घातला़ त्यामुळे नंदकिशोर बेशुद्ध पडले़ याने अस्वस्थ झालेल्या पार्वतीने थेट पोलीस ठाणे गाठले व घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली़ तर दुसरीकडे नंदकिशोर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ या प्रकरणी प्रथम पार्वतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला़ नंतर तिच्यावर खुनाचा आरोप ठेवला़ (प्रतिनिधी)