शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातील बंडाचा डाव उधळला

By admin | Updated: January 2, 2015 02:41 IST

राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता;

३१ डिसेंबरच्या रात्रीचा प्रकार : राज्यभरातील वायरलेस यंत्रणा बंद पाडण्याचा प्रयत्न फसला विनोद काकडे - औरंगाबाद पोलिसांच्या मागण्या आणि समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला राज्यातील वायरलेस यंत्रणा (बिनतारी संदेशवहन यंत्रणा) बंद पाडण्याचा धक्कादायक कट काही कर्मचाऱ्यांनी रचला होता; परंतु उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत समयसूचकतेने हे प्रकरण हाताळल्यामुळे हा डाव उधळला गेल्याचे समजते. पोलीस दलाच्या वायरलेस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. २००५पासून या विभागासाठी भरतीच झालेली नाही. ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री बरोबर १२ वाजता (नववर्षाच्या पहिल्या ठोक्याला) संदेशवहन यंत्रणा बंद पाडण्याचा कट रचला गेला होता, असे सूत्रांकडून समजते.गेल्या महिनाभरापासून या बंडाची डाळ शिजत होती. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती; परंतु ऐनवेळी गृहविभागाला याची कुणकुण लागली अन् उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना आखल्या. त्यामुळे हा कट फसला. जर तो यशस्वी झाला असता तर काही क्षणापुरती का होईना राज्यभरातील अख्खी पोलीस यंत्रणा ठप्प झाली असती. कोठे काय घडले, घडत आहे, काय करायचे आहे, याची काहीच माहिती पोलिसांना मिळू शकली नसती. तीन दशकांपूर्वीही...तीन दशकांपूर्वी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे बंड करून संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु शासनाने तो हाणून पाडला. त्या वेळी तसा प्रयत्न करणाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या बंडाचा हा प्रकार उजेडात आल्याने आता पुन्हा पोलीस दलातील असंतोषाला तोंड फुटले आहे. पोलीस ठाणे, चौक्या, पोलीस गाड्यांमध्ये असलेली वायरलेस यंत्रणा आॅपरेट करण्यासाठी पोलीस शिपाई नियुक्त केलेला असतो; परंतु शिपायाऐवजी फौजदार दर्जाचे अधिकारी नेमण्याचे आदेश गृहविभागाकडून ३१ डिसेंबरच्या रात्री अचानक देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी पार पाडली. आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली ३१ तारखेला असे काही घडणार, याची कुणकुण आम्हाला लागली होती. मात्र आम्ही कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि असे काहीच घडले नाही.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्य मंत्री