शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दहशत चार दिवसांनंतरही कायम!

By admin | Updated: April 25, 2015 02:14 IST

कापशी हैदोस प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी.

सचिन राऊत /अकोला : रस्ते चकाचक; मात्र दुचाकींसह इतर वाहने भंगारावस्थेत पडलेली.. इमारती आलिशान; मात्र महागडे गेटलाईट, टीव्ही आणि खिडक्यांच्या काचा फोडलेल्या.. लहान-मोठय़ा घराचे दरवाजे तोडलेले अन् कुलर पडलेले.. बहुतांश वारकरी सांप्रदायाचे, त्यामुळे गावात भांडण तंटा नाहीच.. मात्र पोलिसांनी मंगळवारी रात्रभर घातलेल्या हैदोसाने सधन कापशीचा चेहरा विद्रुप झाला. घटना होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसी क्रौर्याच्या खूणा आजही गावात दिसून येतात. गावात जुगारावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाला. याच कारणावरुन जवळपास १५0 पोलिसांनी गावात प्रत्येकाच्या घरात घुसून प्रचंड तोडफोड, नासधूस केली. जुगार खेळणारे कापशीतीलच ग्रामस्थ आहेत किंवा नाही, याची शहानिशा न करता पोलिसांनी महिला, वृध्द, गर्भवती, चिमुकल्यांसह कुणालाही न सोडता अत्याचाराची परिसीमा गाठली. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे, पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी गुरुवारी गावची पाहणी केली असता, गावचे चित्र पाहून त्यांची मनेही हेलावली. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी ग्रामस्थांसमोर जाहीर माफी मागितली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासनही दिले; मात्र लहान मुलं, महिलांमध्ये पोलिसांची दहशत चार दिवसानंतरही कायम होती. पोलिसांनी गावातील १00 वर वाहनांची तोडफोड केली, घराचे दरवाजे मोडले, भिंती पाडल्या, खिडक्यांचा काचा फोडल्या, कुलर मोडले, टीव्ही फोडल्या, बहुतांश घरांतील साहित्याची नासधूस केली. या कृत्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. गुंडांनाही लाजविणारा ह्यखाकीह्णचा अत्याचार बिहारमध्ये घडणार्‍या घटनांपेक्षाही गंभीर असल्याचे खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कबुल केले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी गावात हैदोस घालून केलेली नासधूस ही त्यांनी केलेल्या कृत्याची साक्ष देणारी आहे. त्यामुळे संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलिसी क्रौर्याच्या खूणा अशाच ठेवल्या जातील, असा इशारा कापशीवासीयांनी दिला आहे.