शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पोलिसांच्या बदलीचा आदेश फिरवला

By admin | Updated: December 19, 2015 00:29 IST

दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा

- नरेश डोंगरे,  नागपूरदोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीमुळे निर्माण झालेली पोलीस दलातील खदखद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचा ‘तो‘ आदेशच फिरवला. परिणामी काही प्रमाणात का होईना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील रोष निवळण्यास मदत झाली आहे.गृहविभागाने ३ डिसेंबरला अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, बढत्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर ५ डिसेंबरला राज्यातील पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापूरचे अधीक्षक मनोज शर्मा यांचाही समावेश होता. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका वठविणाऱ्या शर्मा यांची कोल्हापूरहून बृहन्मुंबईला उपायुक्त म्हणून बदली जाहीर करण्यात आली होती. तर, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिकचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना कोल्हापूरला अधीक्षक म्हणून नेमण्यात आले. देशपांडेंच्या रिक्त जागेवर वाशिमच्या अधीक्षक विनिता साहू, तर साहू यांच्या रिक्तपदी भंडाराचे अधीक्षक दिलीप झळके आणि उपायुक्त एम. के. भोसले यांना मुंबईहून त्याच पदावर बृहन्मुंबईला पाठविण्यात आले होते. भंडारा अधीक्षक पद रिकामे ठेवण्यात आले होते. बदल्यांची यादी जाहीर होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात (एका गटात) कमालीची खदखद निर्माण झाली होती. काही अधिकाऱ्यांनी या बदल्यांसाठी जोर लावल्याचे आणि वरिष्ठ पातळीवर एकतर्फी निर्णय घेतल्याचे उघडपणे बोलले जात होते. ‘मानहानीकारक निर्णय‘ अशा शब्दात या बदलीचे विश्लेषण करून बहुतांश वरिष्ठ नाराजी व्यक्त करीत होते. ही नाराजी कोल्हापूर, मुंबई, पुण्यापासून गडचिरोली, गोंदियापर्यंत चर्चेला आली होती. पोलीस महासंचालनालय व गृहमंत्रालयात सेतू म्हणून काम करणाऱ्या काहींनी ती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.नवा आदेश, नवी जबाबदारी १५ डिसेंबरला तीन पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार, बृहन्मुंबईतील उपायुक्त प्रशांत होळकर यांना वाशिमचे पोलीस अधीक्षक, विनिता साहू यांना गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक ऐवजी भंडारा येथे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना वाशिम ऐवजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूरचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले.