शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोक्क्याखाली अटकेत कैद्यांसोबत पोलिसांची ओली पार्टी

By admin | Updated: June 16, 2016 22:25 IST

सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 16 - सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात अट्टल कैद्यांसोबत दोघा पोलिसांनी ओली पार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी रुग्णालयात छापा टाकल्यानंतर टेरेसवरुन उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्न करताना तिघे कैदी जखमी झाले. याप्रकरणी मोकाखाली अटकेत असलेल्या सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन पोलिसांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस मुख्यालयातील सहाय्यक फौजदार बाबूराव ज्योतीराम चौगुले, आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती भाऊसाो पाटील (बक्कल नंबर १०१८) अशी अटक झालेल्या पोलिसांची नावे आहेत. याशिवाय मोकाखाली कैदेत असलेला सोमप्रशांत पाटील याच्यासह दिग्विजय शिवाजीराव पोवार (३७ रा. सनसिटी न्यू पॅलेस, कोल्हापूर) यालाही अटक झाली आहे.कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून पळून जाताना जखमी झालेले संशयित आरोपी संजय दिनेशराव कदम ,जगदिश प्रभाकर बाबर, अभिजित शरद चव्हाण (सर्व रा. कोल्हापूर) या तिघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील गजा मारणे टोळीतील सोमप्रशांत पाटील हा सीपीआर येथील कैदी वॉर्डात दि. १३ मे २०१६ पासून मूत्रपिंडाच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल आहे. बुधवारी रात्री संशयित सहाय्यक फौजदार बाबूराव चौगुले, कॉन्स्टेबल मारुती पाटील हे सोमप्रशांत पाटील, दिनेश कदम, जगदिश बाबर, अभिजित चव्हाण, दिग्विजय पोवार हे कैदी असे सातजण कैदी वॉर्डच्या इमारतीच्या टेरेसवर मद्यप्राशन करून जेवायला बसले होते. हा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला.

पोलिस आल्याचे पाहताच त्यांची एकच धांदल उडाली. त्यावेळी संजय कदम, जगदिश बाबर व अभिजित चव्हाण या तिघांना इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. त्यामध्ये बाबर व अभिजित चव्हाण या दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले तर दिनेश कदमचा हात मोडला व ते जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात वापरलेली कार, एक दुचाकी, ५३ हजार रुपये, किमती विदेशी दारू, रिकाम्या बाटल्या असा सुमारे नऊ लाख ८९ हजार ६७० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.