शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांचे सायकल पेट्रोलिंग

By admin | Updated: November 27, 2015 00:12 IST

पोलीस अधिकाऱ्यांचे सायकल पेट्रोलिंग

सातपूर : पायी फिरून संवाद साधण्याबरोबरच आता पोलीस अधिकाऱ्यांनी सायकल पेट्रोलिंगचा नवा प्रयोग सुरू केला आहे. पोलीस वाहनातून फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना सायकल चालविताना पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण होत आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांमध्ये मिसळून संवाद साधण्याबरोबरच पोलीस मित्र तयार केले पाहिजेत, असा मंत्र पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलीस वाहनातून सायरन वाजवित फिरणारे पोलीस आता सायकलचे पॅडल मारताना पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटवर्क साधण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. आपापल्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची माहिती तत्काळ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर अपलोड करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.पोलिसांनी सुरू केलेल्या पायी संवाद, रिक्षांवर हेल्पलाइन क्रमांक, दिवाळीत गोरगरीब चिमुकल्यांना मिठाई वाटप आणि जनसंपर्क वाढविणे या विविध उपक्रमांसह आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सायकलवर फेरफटका मारताना सातपूर परिसरात दिसून येत आहे. सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे, सहायक पोलीस निरीक्षक माधवी वाघ आदि अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सायकल पेट्रोलिंगचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकून घेतली जात आहेत. (वार्ताहर)