शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्ससह वित्तसंस्थांना पोलिसांच्या नोटिसा

By admin | Updated: August 22, 2016 03:04 IST

सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या ज्वेलर्ससह शहरातील वित्तसंस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या ज्वेलर्ससह शहरातील वित्तसंस्थांना पोलिसांनी नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. सीवूडमधील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर पडलेल्या दरोड्यानंतर त्याठिकाणचा सुरक्षेतला हलगर्जीपणा समोर आला आहे. यापूर्वी देखील ज्वेलर्सवर अशाप्रकारे दरोड्याच्या घटना घडलेल्या असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या ज्वेलर्ससह वित्तसंस्थांची झाडाझडती घेण्याला सुरवात केली आहे.सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना ६ आॅगस्टला घडली आहे. अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळीने त्याठिकाणच्या सुरक्षेतल्या हलगर्जीपणाचा फायदा घेत हा दरोडा टाकला. यामध्ये पॉप्युलर फायनान्समध्ये जमा असलेले सुमारे २३ किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७ कोटींचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच पोलिसांनी शहरातील ज्वेलर्स व वित्तसंस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. अनेक ठिकाणी सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याचे उघड झाले आहे. दरोडेखोरांनी लुटून नेलेल्या दागिन्यांचा विमा असल्यामुळे पॉप्युलर वित्तसंस्थेने घटनेचे फारसे गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येत आहे. मात्र या घटनेच्या माध्यमातून गुन्हेगारांनी नवी मुंबई पोलिसांना आव्हान दिलेले असल्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. >शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचनाअशा प्रकारच्या दरोड्याच्या घटनांचे पोलिसांनी गांभीर्य घेतले आहे. यापूर्वीही खारघर, दिघा, वाशी याठिकाणी अशा प्रकारे दरोड्याच्या घटना घडल्या असून त्यापैकी काही गुन्ह्यांची अद्याप उकल देखील झालेली नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा असे दरोडे पडू नयेत याकरिता सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या वित्तसंस्था व ज्वेलर्सची झाडाझडती घेण्याला पोलिसांनी सुरवात केली आहे. ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचा डिव्हीआर गुप्त ठिकाणी ठेवावा, दर्शनी भागात खरे दागिने ठेवू नयेत तसेच बँका, फायनान्स कंपन्या यांनी शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत अशा वेळोवेळी सूचना पोलिसांकडून केल्या जातात. यानंतरही अगदी सूचनेच्या विरुध्द चित्र शहरात अनेक ज्वेलर्स व वित्तसंस्थांमध्ये पहायला मिळत आहे. याचाच पुरेपूर फायदा गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. त्याकरिता गुन्हेगारांच्या टोळ्या अशा वित्तसंस्थांवर नजर ठेवून असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.