शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त मुलगा बनला पोलीस निरीक्षक

By admin | Updated: August 11, 2015 01:49 IST

पोलीस निरीक्षक बनण्याची एका चिमुरड्याची इच्छा होती. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याला कॅन्सरने ग्रासले. त्याची ही इच्छा अपुरीच राहणार अशी भीती त्याला वाटत होती, मात्र भोईवाडा

मुंबई : पोलीस निरीक्षक बनण्याची एका चिमुरड्याची इच्छा होती. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याला कॅन्सरने ग्रासले. त्याची ही इच्छा अपुरीच राहणार अशी भीती त्याला वाटत होती, मात्र भोईवाडा पोलिसांनी या चिमुरड्याची इच्छा सोमवारी पूर्ण केली. कुवरसिंह पाटील (५) असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यात राहतो. हुशार आणि सर्वांचा लाडका असलेल्या या चिमुरड्याला डिसेंबर महिन्यात रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी मुंबईला आणले. सध्या त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान ‘मेक अ विश’ या संस्थेच्या एका कार्यकर्त्याला त्याने आपली पोलीस बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले. संस्थेने भोईवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या चिमुरड्याची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दर्शवली. सोमवारी सकाळी पोलिसांच्या गणवेशात त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. काही वेळ त्याच्याच आदेशाने पोलिसांचे कामकाज सुरू होते. या चिमुरड्याला पोलिसांबद्दल असलेले कुतूहल पाहून पोलिसांनीदेखील त्याच्या आदेशाचे पालन केले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीतूून संपूर्ण परिसरात फिरवण्यात आले. आपल्या चिमुकल्याचा हा थाट पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले. तीन तास त्याचा हा थाट होता. त्यानंतर तो पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी निघाला, तेव्हा सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत होते. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. (प्रतिनिधी)