शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कापशी गावात पोलिसांचा धुडगूस!

By admin | Updated: April 23, 2015 05:25 IST

शहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गावात

सचिन राऊत, अकोलाशहरापासून जवळच असलेल्या कापशी (जुनी) गावात मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी गावात रात्रभर धुडगूस घातला. तब्बल २०० पोलिसांच्या जमावाने १०० हून अधिक दुचाकींची तोडफोड केली. गरोदर महिला, वृद्ध, मुलांना घराबाहेर काढून, तर काहींच्या घरात घुसून पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्या या ‘गुंडगिरी’ने संपूर्ण गाव दहशतीत आहे.गृहराज्यमंत्री (शहर) व अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घटनेची माहिती घेतली असून निष्पाप ग्रामस्थांना त्रास देणे मुळीच समर्थनीय नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.कापशी येथील तलावाच्या काठावर दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार खेळला जातो. जुगाराचे प्रमाण एवढे मोठे असते की, परिसराला यात्रेचे स्वरूप येते. मंगळवारी जुगारावर छापा मारण्यासाठी पातूर पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी किरकोळ कारवाई केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने साध्या वेशात छापा मारला. त्यात काही जुगाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर विशेष पथक व यात्रेकरूंमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र त्यानंतर तब्बल २०० पोलिसांचा ताफा कापशी येथे धडकला. त्यांनी संपूर्ण गावात प्रचंड नासधूस व तोडफोड केली. जयश्री विवेक मानतकर या गरोदर महिलेच्या पोटावर पोलिसांनी काठ्या टोचल्या. पोलिसांना रोखणाऱ्या विवेक मानतकर यांनाही बेदम मारहाण केली, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.