शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात फेरबदल

By admin | Updated: August 15, 2015 00:31 IST

राज्य पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या जागी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती जवळपास नक्की मानली जात आहे.

- यदु जोशी,  मुंबईराज्य पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या जागी प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती जवळपास नक्की मानली जात आहे. दयाळ ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचीही त्याचवेळी पदोन्नती होणार असल्याने मुंबई पोलिसांना नवा कॅप्टन मिळणर आहे. दीक्षित हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक आहेत. पोलीस महासंचालकपदासाठी ज्येष्ठतेचा विचार करता त्यांचेच नाव पुढे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनाच पसंती देतील असे म्हटले जाते. एसीबीचे प्रमुख म्हणून दीक्षित यांची कारकिर्द नेहमीच प्रभावी राहिली आहे. अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. सेवाज्येष्ठतेचा विचार करता दत्ता पडसळगीकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते सध्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये (आयबी) अतिरिक्त संचालक आहेत. त्यांना तिथेच संचालक म्हणून पदोन्नती मिळाली तर मात्र अन्य नावांचा विचार होऊ शकतो. त्यात के.के.पाठक, प्रभात रंजन, व्ही.डी.मिश्रा, सुबोधकुमार जयस्वाल, के.एल.बिष्णोई, एस.पी.यादव आणि संजय बर्वे यांचा समावेश आहे. सेवाज्येष्ठतेत मागे असले तरी जयस्वाल आणि बर्वे आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आयुक्त कोण होणार याला अधिक महत्त्व असेल. पोलीस महासंचालकपदानंतर प्रतिष्ठेचे मानले जाते ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद. या पदावर कोणाची नियुक्ती होणार या बाबत उत्सुकता आहे. त्यासाठी अहमद जावेद (महासंचालक; होमगार्डस्), विजय कांबळे (महासंचालक; राज्य पोलीस सुरक्षा महामंडळ) आणि सतीश माथूर (महासंचालक; विधी व तांत्रिक विभाग) यांची नावे आघाडीवर आहेत. त्यातील अहमद जावेद हे जानेवारी २०१६ मध्ये तर विजय कांबळे फेब्रुवारी २०१६ मध्ये निवृत्त होत आहेत. त्यांना अनुक्रमे चार- पाच महिन्यांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदी आणले जाईल का हा प्रश्न आहे. इतक्या अल्पकाळासाठी दोघांपैकी एकाला एसीबी प्रमुख करण्याऐवजी अधिक कालावधी असलेल्या व्यक्तीला नेमण्याचे ठरले तर सतीश माथूर यांचे नाव नक्की होईल, असे मानले जाते. माथूर जून २०१८ मध्ये निवृत्त होणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित प्रकरणांची चौकशी सध्या एसीबीकडे आहे. चढती भाजणी- राज्य पोलीस दलात महासंचालक दर्जाच्या सहा जागा आहेत. त्यातील दयाळ आणि राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे महासंचालक असलेले अरुप पटनायक हे दोघेही ३० सप्टेंबरला निवृत्त होतील.- मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि मीरा बोरवणकर हे सध्या अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. -या दोघांना पुढील महिन्यात दयाळ आणि अरुप पटनायक यांच्या निवृत्तीनंतर महासंचालक म्हणून पदोन्नती मिळेल.