शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील लोकप्रतिनिधींच्या घरांसह कार्यालयांना पोलीसांचा गराडा

By admin | Updated: June 7, 2017 14:36 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चा काढू असा इशारा दिला होता़ याच पार्श्वभूमीवर कोणताच अनुचित प्रकार घडू नये याबाबतची काळजी घेत शहर व ग्रामीण पोलीसांनी लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर व संपर्क कार्यालयांना पोलीस छावणीचे स्वरूप देत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे़ मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे़ संपाच्या सहाव्या दिवशी तहसिल कार्यालयांना टाळे ठोक आंदोलनानंतर संपाच्या सातव्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे काढू असा इशारा संपकरी शेतकरी संघटनांनी दिला होता़ याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीसांनी शहरात असलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोउद्योग मंत्री सुभाष देशमुख, खा़ शरद बनसोडे, आ़ प्रणिती शिंदे यांच्या घरासह संपर्क कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ याशिवाय माजी उपमुख्यमंत्री तथा खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ हनुमंत डोळस, बार्शीचे आ़ दिलीप सोपल, करमाळा येथील आ़ नारायण पाटील, पंढरपूरचे आ़ प्रशांत परिचारक, आ़ भारत भालके, सांगोल्यातील आ़ गणपतराव देशमुख, माढाचे आ़ बबनराव शिंदे, आ़ दत्तात्रय सावंत यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ग्रामीण पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ ------------------------------सोपल यांनी स्वत: कुलुप लावुन शेतकरी संपाला दिला पाठींबाराज्यात सुरु झालेल्य शेतकरी संप आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे़ लोकप्रतिनिधी च्या कार्यालयालया टाळे ठोकण्याचा आजचा कार्यक्रमामुळे बार्शीत आ.दिलीप सोपल यांच्याही घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ हा पोलीस बंदोबस्त पाहुन व शेतकरी संपाला पाठींबा देण्याच्या उद्देशाने आ.सोपल यांनीच स्वत: हुन आगळगाव रोड स्थीत "सोपल बंगला " या कार्यालयास टाळे लावुन आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे. २८८ व ७८ आमदारापैकी आ.सोपल हे एकमेव स्वत: हुन कार्यालयास कुलुप ठोकुन शेतकरी संप आंदोलनास पाठींबा देणारे एकमेव आमदार ठरले आहेत.----------------------मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चे काढून शासनाचा निषेध व्यक्त करू इशारा दिला होता़ त्याच पार्श्वभूमीवर शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर व संपर्क कार्यालयांवर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ - अपर्णा गीतेपोलीस उपायुक्त, सोलापूर शहर पोलीस दल़