शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डनमन दत्ता फगे खुनातील आरोपीना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: July 21, 2016 19:12 IST

गोल्ड मॅन दत्ता फुगे याच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलिस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले

ऑनलाइन लोकमत

पिंपरी- चिंचवड, दि. 21 : गोल्ड मॅन दत्ता फुगे याच्या खूनप्रकरणी दिघी पोलिसांनी अटक केलेल्या सात जणांची पोलिस कोठडी, तर दोघांची न्यायालयीन कोठडी संपल्याने पुन्हा त्यांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी नऊ जणांना सोमवार (दि.२५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अतुल अमृत मोहिते (२५), शौकत मुनीर आत्तार (२४), सुशांत जालिंदर पवार (२०), तुषार कान्हू जाधव (२०, सर्व रा. भारतमातानगर, दिघी), अतुल ऊर्फबल्ली कैलास पठारे (२४, रा. म्हस्के वस्ती, आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (२६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (३२, रा. विश्रांतवाडी), निवृत्ती ऊर्फ बाळू किसन वाळके (४५, विठ्ठल मंदिराजवळ दिघी) आणि प्रेम ऊर्फ कक्का ऊर्फ प्रमोद संताराम ढोलपुरिया (२३, रा. रामनगर, बोपखेल) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

दत्तात्रय ज्ञानेश्‍वर फुगे याचा दिघी येथे गुरुवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास टोळक्याने दगडाने ठेचून, हत्याराने वार करून खून केला. याप्रकरणी फुगे याचा मुलगा शुभम फुगे (२१, रा. भोसरी) याने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या टोळक्याने गोल्ड मॅन दत्तात्रय फुगे याला मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त करून दिघी येथे बोलावून घेतले. त्यानंतर चिटफंडमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशाच्या देण्या-घेण्यावरून दत्तात्रय फुगे याच्यावर तलवार, कोयता, चॉपर आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनातील सर्व मारेकरी फरार झाले होते.

दिघी पोलिसांनी तपास करून पहिले पाच आणि नंतर चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या नऊ जणांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी आणि सात जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी न्यायालयीन कोठडी संपल्याने दोघांना आणि गुरुवारी पोलिस कोठडी संपल्याने सात जणांना खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी सर्व आरोपींना आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या खुनामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, यामागे वेगळे कारण आहे का, फरार आरोपींचा शोध करणे, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करणे यासाठी तपास अधिकार्‍याने सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तपास पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे करत आहेत.