शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चंदन चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: October 13, 2016 05:35 IST

जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानामागील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली.

सांगली : जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानामागील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. झटापटीत चोरट्यांनी पोलिसांवर सशस्त्र हल्लाही केला परंतु सतर्क पोलिसांनी तो परतवून चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अन्य दोघे फरारी झाले आहेत. या टोळीकडून चारचाकी वाहनासह चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील आहे. तानाजी हरी खराटे (३२), राजू कालिदास पाखरे (२५), कांतिलाल उत्तम चवरे (३८), सोनू शंकर बनसोडे (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग चौकातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कॉन्स्टेबल दीपक तुकाराम वडेर यांना झाडे तोडण्याचा आवाज आला. त्यांनी या परिसराची पाहणी केली, त्यावेळी सहाजण चंदनाची झाडे करवतीने कापत असल्याचे दिसले. वडेर यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तसेच शिंदे व उपाध्याय यांच्या निवासस्थानी बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना एकत्र केले. नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी, राखीव दल व निवासस्थानाच्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला. तोपर्यंत चोरटे चंदनाची झाडे तोडून ती लाकडे घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एका चोरट्याने पोलिस कॉन्स्टेबल वडेर यांच्यावर करवतीने हल्ला चढविला, पण हा वार वडेर यांनी काठीने परतवून लावला. इतर दोन संशयितांनी हातातील सत्तूर व तलवारीचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली. राजू पाखरे या चोरट्याला पकडत असताना वडेर यांच्याशी हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी सहापैकी चार चोरट्यांना अटक केली असून इतर दोघे सत्तूर व तलवारीचा धाक दाखून पसार झाले. (प्रतिनिधी)