शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळजी नाही : केसरकर

By admin | Updated: April 30, 2015 13:20 IST

पोलिसांबाबत नाराजी : पालकमंत्र्यांकडून खडे बोल

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सोडला, तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मला सुरक्षेबाबतचा कधी प्रश्न उद्भवत नाही. कर्नाटकात मी येणार म्हटल्यावर तेथील अधिकारी फोन करत असतात. मग सिंधुुदुर्गातच मला योग्य सुरक्षा का पुरवली जात नाही, येथील पोलीस माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहे, असे सांगत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांबाबतची आपली नाराजी पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्याकडे व्यक्त केली. तुम्ही माझ्या सुरक्षेबाबत गंभीर नाही, मग सामान्यांची सुरक्षा कशी करणार, असे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.पालकमंत्री केसरकर आढावा बैठकीनिमित्त सावंतवाडीत आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, पोलीस खात्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी बैठकीला फिरकलाच नाही. पोलीस निरीक्षक रणजित देसाई या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. मी सिंधुदुर्ग सोडून कोठेही गेलो, तर माझ्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. मग सिंधुदुर्गमध्येच पोलीस का एवढे बेफिकीर आहेत? ते माझी सुरक्षा करू शकत नाहीत, तर सर्वसामान्य जनतेची सुरक्षा कशी काय करणार, असा सवाल यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षकांना केला.माझ्या बरोबर नेहमी दोन सुरक्षारक्षक राज्यात कुठेही गेलो तरी असतात; पण सिंधुदुर्गात एकही सुरक्षा रक्षक नसतो. रेल्वेने प्रवास मी एकटा करतो. त्यावेळी कोणीही बरोबर नसतो. कर्नाटकात मी गेल्यास तेथे कर्नाटक राज्याचे पोलीस व्हॅन घेऊन उभे असतात. अनेकवेळा मला वेळ झाला, तर सतत संपर्क करीत असतात; पण येथील पोलिसांना माझ्या सुरक्षेची काळर्जी नाही का? तसे असेल, तर मला तुमच्या वरिष्ठांशी बोलावे लागेल, असे सांगितले.मी तीस मंत्र्यांमधील एक मंत्री असून मलाही प्रोटोकॉल आहे. येथील पोलीस जर प्रोटोकॉलच विसरत असतील, तर त्यापेक्षा वाईट ते काय, असा सवालही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)यापूर्वीही गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रारपालकमंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वीही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे गोव्यात सुरक्षा मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी शिंदे यांनी आपणासही गोव्याने सुरक्षा दिली नाही, असे सांगत आपण काही करू शकत नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी पालकमंत्री केसरकर यांनी ही तक्रार केली आहे.