शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याच्या भांडणात पोलिसाला मारहाण

By admin | Updated: February 16, 2017 05:01 IST

धारावीत पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना

मुंबई : धारावीत पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.कल्याण येथील रहिवासी असलेले विजय पवार (३७) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. ते शाहूनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते धारावी परिसरात गस्त घालत होते. त्याच दरम्यान, धारावी येथील कुंभारवाडा परिसरात अरिना खातून (३२) यांना त्यांचा पती दारूच्या नशेत मारझोड करीत होता. तेव्हा अरिना यांनी गस्तीवरील पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा पवारसह त्यांच्या सहकाऱ्याने मध्यस्थी करत, त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने गस्तीवर असलेल्या पवार यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले अंमलदार वाघ आणि पावस्कर यांना ढकलून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पाठलाग करून पोलिसांनी खातून या आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)