शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 01:51 IST

घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या

मुंबई : घरातील जेवणातून एकाच कुटुंबातील तीन जणांना विषबाधा होऊन पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली. पहिल्यांदा या आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांचा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.कुर्ल्याच्या ख्रिश्चन गाव येथे जोेसेफ मकासरे (५२) हे त्यांची पत्नी स्मिता मकासरे (४८) आणि मायकल मकासरे (२२) यांच्यासोबत राहत होते. महापालिकेत जोसेफ हे कंत्राटदार होते. गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर तिघांना उलटी आल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलावले. डॉक्टराने काही औषधे दिल्यानंतर त्यांना काही वेळ बरे वाटू लागले. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा सर्वांना चक्कर येत असल्यासारखे वाटू लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांना विद्याविहार येथील कोहिनूर रुग्णालयात दाखल केले. मात्र दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास यातील मायकल आणि त्यानंतर सहा वाजण्याच्या सुमारास जोसेफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.विनोबा भावे नगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. तसेच या कुटुंबीयांनी हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी गंभीर अवस्थेत असलेल्या स्मिता मकासरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुरुवारी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. तसेच अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी केवळ घटनेची नोंद करीत तपास सुरू केला आहे. मात्र शनिवारी मध्यरात्री स्मिता मकासरे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. रविवारी तिघांवर सायन येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी धाडले होते. या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तिघांचाही मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्नाचे नमुने कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.