शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पीएनपी जेट्टी बनावट कागदपत्रप्रकरणी तिघांना जामीन

By admin | Updated: July 16, 2017 00:59 IST

पीएनपी जेटीच्या बनावट सरकारी कागदपत्र प्रकरणाचे आरोप असलेले शेकापचे आमदार जयंत पाटील, त्यांचा मुलगा नृपाल पाटील आणि तत्कालीन बंदर अधिकारी

- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पीएनपी जेटीच्या बनावट सरकारी कागदपत्र प्रकरणाचे आरोप असलेले शेकापचे आमदार जयंत पाटील, त्यांचा मुलगा नृपाल पाटील आणि तत्कालीन बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर हे शनिवारी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अविनाश क्षीरसागर यांच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. शहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये जेट्टी बांधण्यासाठी सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्रप्रकरणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील, नृपाल जयंत पाटील तसेच तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी यांनी १८ एप्रिल २०१७ रोजी दिले होते. दरम्यान, जयंत पाटील यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध सेशन कोर्टात व नंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. सेशन कोर्टाने त्यांना कोणताही दिलासा न देता सुनावणी २८ जुलै रोजी ठेवली होती. पाटील यांनी यानंतर ४ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली होती. १० जुलै रोजीही आरोपी न्यायालयात हजर राहिले नसल्याने न्यायालयाने १५ जुलै रोजी आरोपी न्यायालयात हजर राहतील, अशी लेखी हमी त्यांच्या वकिलांकडून घेतली होती. त्यानंतर आरोपींकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला. अखेर न्यायालयाने आरोपींना दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कॅप्टन पंकज भटनागर यांचाही जामीन अर्ज मंजूर झाला.प्रकरण काय आहे?शहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मोरा बंदर समूहाचे तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्या सहीची बनावट कागदपत्रे बनवून बंदर उद्योगासाठी अनधिकृत जेट्ट्या उभारल्या. त्याच बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून सुमारे ५६ कोटींचे कर्ज मिळविल्याप्रकरणी रायगड जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आ. जयंत पाटील, नृपाल जयंत पाटील, तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्याविरु द्ध गुन्ह्यांची प्रक्रि या सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.