शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोच्या मदतीसाठी ‘पीएमपी’चाही विकास

By admin | Updated: March 10, 2017 05:32 IST

मेट्रो स्थानकांजवळ येणे सोयीचे झाले, तरच मेट्रोची प्रवासीसंख्या वाढेल. त्यामुळे मेट्रो स्थानकापर्यंत प्रवासी पोहोचविणाऱ्या पीएमपी तसेच सायकल ट्रॅक

पुणे : मेट्रो स्थानकांजवळ येणे सोयीचे झाले, तरच मेट्रोची प्रवासीसंख्या वाढेल. त्यामुळे मेट्रो स्थानकापर्यंत प्रवासी पोहोचविणाऱ्या पीएमपी तसेच सायकल ट्रॅक व अन्य वाहतुकीचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय मेट्रो कंपनीच्या संचालक मंडळाच्या दिल्ली येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यात पहिल्या टप्प्यात पीएमपीची पुणे व पिंपरी-चिंचवड येथील मिळून १० स्थानके विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या १२५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्याच्या नगरविकास खात्याचे सचिव डॉ. नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नागपूर महापालिकेचे आयुक्त व केंद्रीय नगरविकास विभागाचे अन्य काही अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पीएमपीच्या सक्षमीकरणाचा हा प्रस्ताव कुणाल कुमार यांनी सादर केला होता. त्यासाठी त्यांनी वनाझ ते रामवाडी या मार्गात बदल झाल्याचा आधार घेत त्यामुळे मेट्रोचे एक स्थानक कमी होणार असल्याचे निदर्शनास आणले. सायकल वापराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिका सायकल ट्रॅक व सायकल स्टेशन्स तयार करीत आहे. याशिवाय बीआरटी मार्गांचाही विकास करण्याचा प्रस्ताव तयार आहे. सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करणाऱ्या या सर्व योजनांसाठी म्हणून एकच बोधचिन्ह असावे, असे काही संचालकांनी बैठकीत सुचवले. ते मान्य होऊन महामेट्रो कंपनीच्या वतीने या बोधचिन्हासाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.मेट्रोचा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचा असेल, तर त्यासाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणे हाच मार्ग आहे. तसे व्हावे यासाठी मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांना येणे सोयीचे व्हायला हवे. ते करायचे असेल, तर पीएमपीची अशी किमान १० स्थानके पायाभूत सुविधांनी संपन्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा खर्च असून तो मेट्रोच्या वगळण्यात आलेल्या स्थानकांसाठीच्या खर्चातून करणे शक्य आहे, असा प्रस्ताव कुणार कुमार यांनी दिला होता. यावर दिल्लीच्या बैठकीत चर्चा होऊन या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढील बैठकीत या १० स्थानकांच्या विकास आराखड्याचा सविस्तर तपशील सादर करण्यास सांगण्यात आले. हा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार, ब्रिजेश दीक्षित व या क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांची समिती तयार करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामुळे आता मेट्रो अस्तित्वात येत असतानाच तिच्या बरोबरीनेच पीएमपीचेही सक्षमीकरण होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)भुयारी स्थानक रद्द पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील भारतीय पुरातत्त्व विभागाजवळ (एएसआय) दर्शविण्यात आलेले भुयारी स्थानक रद्द करण्यावर गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. शहरातील तिन्ही मेट्रो मार्गांसाठी ‘इंटर-चेंज’ स्टेशन म्हणून शिवाजीनगर धान्य गोदामाची जागा अंतिम केली जाणार आहे.