शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्याच्या नावाखाली एजंटकडून लूट

By admin | Updated: October 19, 2016 03:16 IST

पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर बसलेल्या एजंटकडून दाखल्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे.

मयूर तांबडे,

पनवेल- पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर बसलेल्या एजंटकडून दाखल्यांसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे. दाखल्यांसाठी प्रत्येकी ५०० रुपये आकारले जात आहेत. पनवेल तहसीलदार कार्यालयात दाखले, शासकीय कामे करण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. कार्यालयासमोर बसलेले एजंट दाखल्याच्या नावाखाली नागरिकांकडून जास्त पैसे उकळत आहेत. याबाबतच्या अनेक तक्र ारी तहसील विभागाकडे करण्यात आल्या आहेत. सोमवारी नीलम गुप्ता ही महिला निवासी दाखला काढण्यासाठी आली होती. यावेळी एजंटने दाखला काढण्यासाठी पाचशे रु पये खर्च येईल, असे नूर नामक एजंटने सांगितले. एका दाखल्यासाठी एवढा खर्च सांगितल्यावर नीलम यांनी दाखला न काढण्याचे ठरविले व त्यांनी सेतू केंद्रात जाऊन दाखला काढण्याचा अर्ज विकत घेतला व स्वत:च दाखला काढण्यास सुरुवात केली. त्यासाठी केवळ ५० रुपये खर्च आल्याचे नीलम यांनी सांगितले. तहसील कार्यालयाबाहेरील एजंटकडून नागरिकांची लूट सुरू असून हे प्रकार थांबविण्यात यावे, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हे एजंट रस्त्यावरील जागा अडवत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. प्रवेश प्रक्रिया, नोकरभरतीसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. वारंवार हेलपाटे मारावे लागू नये, म्हणून काही जण हे शुल्क भरतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अशा एजंटवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)मंगळवारी सर्व एजंटांना तहसील कार्यालयात बोलावले होते. समोर बसलेल्या एजंटना बुधवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जागा खाली करण्यास सांगितले आहे. दोन दिवसांनी येथे एकही एजंट दिसणार नाही.- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल