शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

महापालिकेकडून खेळाडूंना मैदानात नो एन्ट्री

By admin | Updated: January 16, 2017 02:58 IST

शाळेच्या व्यतिरिक्त मैदाने स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सिडकोच्या सूचनांना महापालिकेने हरताळ फासला

नवी मुंबई : शाळेच्या व्यतिरिक्त मैदाने स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या सिडकोच्या सूचनांना महापालिकेने हरताळ फासला आहे. नेरूळ, वाशीसह अनेक ठिकाणी पालिका शाळांच्या मैदानाचा उपयोग स्थानिक नागरिकांना करता येत नाही. मैदानबंदीच्या या आदेशामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. नवी मुंबईमधील ज्या मूळ गावांमध्ये खेळण्यासाठी मैदानांचे पुरेसे भूखंड राखून ठेवले नाहीत त्यामध्ये नेरूळचाही समावेश आहे. मैदानांच्या कमतरतेमुळे गावातील तरुण महापालिका शाळेच्या मैदानामध्ये सकाळी व सायंकाळी खेळण्यासाठी उपयोग करतात; पण महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश असल्याचे कारण देऊन शिक्षण मंडळाने मैदानांमध्ये स्थानिक खेळाडूंना प्रवेश देणे बंद केले आहे. प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले आहे. विनंती करूनही खेळण्यास परवानगी दिली जात नाही. यामुळे परिसरातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुटल्यानंतर मैदानांचा वापर स्थानिक तरुणांना करता यावा, अशी अट सिडकोने भूखंडाचे वितरण करताना घातली आहे. खासगी शाळांनाही ते बंधनकारक असताना पालिका मात्र खेळाडूंना मैदानबंदी करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. नेरूळ प्रमाणे वाशीमध्येही पालिका शाळांच्या मैदानामध्ये स्थानिक खेळाडूंना प्रवेश दिला जात नाही. सुरक्षारक्षक मैदानामध्ये पाऊलही ठेवू देत नाहीत. जुईनगरमध्ये शाळेच्या मैदानाभोवती संरक्षण भिंतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे संरक्षण भिंत झाल्यानंतर तेथे खेळता येणार नाही. महापालिकेच्या या निर्णयाविषयी शहरवासीयांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त मैदाने खुली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. >खासगी व महापालिका शाळांची मैदाने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त स्थानिक तरूणांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत; पण नेरूळमधील मैदानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. हा खेळाडूंवर अन्याय असून मैदाने पूर्ववत खुली करण्याची मागणी आम्ही केली आहे. - गिरीश म्हात्रे,नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस>खासगी शाळांनाही ते बंधनकारक असताना पालिका मात्र खेळाडूंना मैदानबंदी करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.