मुंबई : प्लॅस्टिकबंदीचे आदेश काढल्यानंतर त्याचे वास्तव समोर येत असून अनेक बड्या कंपन्यांना त्यातून सोडल्याचे चित्र आहे. छोट्या विक्रेत्यांवर मात्र दंडाची कारवाई जोरात सुरू झाली आहे. या निर्णयाचा फटका छोटे व्यापारी, महिला बचत गटांना बसला आहे. प्लॅस्टिक बंदीला विरोध नाही पण सरकारने सर्वांना सारखा न्याय लावला पाहिजे, भेदभावाची निती सरकार कशी राबवू शकते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही दिलेले नाही. लघु उद्योगांचे कंबरडे मोडण्याची भीती आहे.अनेक बड्या ब्रँडेड कंपन्यांना प्लॅस्टिक बंदी नाही पण त्याच वस्तू विकणाऱ्या छोट्या उद्योजकांवर मात्र बंदी घातली गेल्याने निकोप स्पर्धाच धोक्यात आली आहे. तांदूळ, साखर, डाळी, धान्य विक्रेते किलो, अर्धाकिलो, पावकिलो माल पिशव्यांमध्ये देतात, त्यांच्यावर बंदी आहे. ब्रँडेड कंपन्यांद्वारे प्लॅस्टिक पिशव्यामध्ये विकल्या जाणाºया त्याच मालाला माफी आहे. चिप्स, शेव, चिवडा विकणारे छोटे व्यापारीही भरडले जात आहेत.व्यापारी आक्रमकराज्यात मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणचे छोटे व्यापारी बंदीविरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील व्यापाºयांनी सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन केले. पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे बापट म्हणाले.मोठ्या कंपन्यांना मुदतमोठ्या कंपन्यांना ३ महिन्याची मुदत दिल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले. मात्र हीच मुदत छोट्या उद्योजकांना सरकार का देत नाही असे विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले. जर जनतेतून व व्यापाºयांमधून दबाव निर्माण झाला तर बड्या उद्योजकांवरही कारवाई होईल, असे अजब तर्कशास्त्र पर्यावरण मंडळाच्या एका अधिकाºयाने सांगितले.महिला बचतगट नाराजमहिला बचत गटांमध्ये या निर्णयाचे तीव्र पडसाद आहेत. आम्ही एकत्र येऊन मेहनतीने घर चालवतो ते सरकारला मान्य नाही का? असा सवालही महिलांनी केला आहे.कशावर बंदी?हॅण्डल असलेल्या व नसलेल्या पिशव्याथर्माकोल व प्लॅस्टिकचे ताट, कप, प्लेट, ग्लास, वाटी, चमचेहॉटेलमधील एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारी भांडी, थर्माकोलची सजावटकशावर नाही?औषधांचे वेस्टन, सिरप व गोळ््यांची बाटलीकृषी कामासाठीची कंपोस्टेबल प्लॅस्टिक पिशवी, निर्यातीसाठीचे प्लॅस्टिकदुधाच्या पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीची पिशवीथर्माकोल बॉक्स व पॅकेजिंग, ओव्हन गोणीउद्योग अवलंबूनराज्यात प्लॅस्टिकवर अवलंबून असणारे २,१५०उद्योग आहेत व त्यांच्यावर अवलंबून असणाºया कामगारांची संख्या ४ लाख ५० हजार आहे. छोट्या उद्योजकांचा राज्याच्या एकूण उत्पादनात ३५ टक्के वाटा आहे. या उद्योगांसमोर पर्याय शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
प्लॅस्टिक बंदीत पक्षपात!, बड्या कंपन्यांना झुकते माप; विक्रेत्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:03 IST