शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी खड्डा; मुंबईतील ११ अटकेत

By admin | Updated: January 15, 2017 01:45 IST

येथे बंद असलेल्या घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या ११जणांना दाभोळ पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

दाभोळ (जि. रत्नागिरी) : येथे बंद असलेल्या घरात गुप्तधनासाठी खड्डा खोदणाऱ्या ११जणांना दाभोळ पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. गुप्तधन खोदण्यासाठी मांत्रिकाने दोन वाहनातून मुंबईतून लोक आणले होते. अटक केलेल्या लोकांच्या नावांबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.येथील गणपती मंदिराच्या पुढील बाजूस नेहमी बंद असलेल्या घरात शनिवारी पहाटे खोदकामाचा आवाज येत होता. याचवेळी दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश तायडे हे सहकाऱ्यांसह मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. त्यांना संशय आल्याने ते या घरात गेले. त्यावेळी पोलिसांना माजघरात एक मोठा खड्डा खणलेला दिसला. खड्ड्याच्या एका बाजूला माती पडलेली दिसली, तर जवळच एकजण मंत्र उच्चारत होता. बाजूला हळद पिंजरीने रेषा आखलेल्या व खड्ड्यामध्ये नारळ, लिंबू असे साहित्य दिसून आले. या घरात दहा अनोळखी लोक व एक महिला दिसली. पोलिसांना सर्वाची कसून चौकशी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला.हे घर आपल्या ताब्यात आहे. आपली आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असून, ती सुधारण्यासाठी भगताने सांगितल्यानुसार आपण गुप्तधन काढण्याच्या हेतूने हा विधी करत आहे. तसेच मंत्र म्हणणारा माणूस हा गुप्तधन काढून देण्याकरिता जादूटोणा करतो, असे त्यातील एकाने सागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व ११ आरोपींना १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)बंगाली मांत्रिकाचा समावेश? दाभोळ येथील घटनेत जादूटोणा करणारा मांत्रिक बंगाली असल्याची चर्चा आहे.