शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समुद्री चाच्यांनी पळवलेला कौस्तुभ सुखरूप परतणार!

By admin | Updated: November 20, 2014 13:22 IST

समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.

अतुल कुलकर्णी, मुंबईसमुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले.मनाला आनंद देणारी ही घटना घडली ती परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्या खा. रक्षा खडसे, महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वेळीच घेतलेल्या पुढाकारामुळे. आपला तरुण मुलगा कौस्तुभ गेल्या साडेतीन महिन्यांपासून संपर्कातच नाही, त्याचा फोनही लागत नाही. त्याच्या आॅफिसला विचारले तर ते सांगतात, त्याचे अपहरण झाले आहे. आमचा म्हातारणीचा आधार गेला, अशा शब्दांत कौस्तुभच्या आईवडिलांनी मुक्ताईनगरात मंत्री खडसे आणि खा. रक्षा खडसे यांना आपले गाऱ्हाणे सांगितले. सतत रडणाऱ्या त्या आईवडिलांना पाहून ते दोघेही हेलावले. खा. रक्षा खडसे या स्थायी समिती सदस्या आहेत. सगळा तपशील घेऊन त्यांनी सुषमा स्वराज यांना गाठले. कौस्तुभ हा ‘कॉटरो अमीबोज’ नावाच्या जहाजावर नोकरीला होता व हे जहाज दक्षिण आफ्रिकेत होते. अधिक माहिती घेतली असता समजले की, त्या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता व त्यात कौस्तुभला त्यांनी पळवून अंगोला देशात नेले होते. सूत्रे हलली. यात महत्त्वाची भूमिका निभावली ती परराष्ट्र खात्याचे सहसचिव संजीव कोहली यांनी. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी होती. त्यांनी तिथल्या भारतीय दूतावासात बोलणी सुरू केली. अंगोला सरकारने चौकशी सुरू केली आणि कौस्तुभ सुखरूपपणे त्यांना सापडला. हे वृत्त स्वत: कोहली यांनी रक्षा खडसे यांना एसएमएस करून कळवले. आता पुढची सूत्र हलवण्यात आली असून, कौस्तुभ दोन -चार दिवसांतच त्याच्या मुक्ताईनगरच्या घरी परत येईल, असे खडसे यांनीच ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुषमा स्वराज आणि कोहली यांच्यामुळेच हे शक्य झाले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.