शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रस्ते हस्तांतरणाविरोधात पायताण मोर्चा

By admin | Updated: May 20, 2017 18:53 IST

रस्ते हस्तांतरणाविरोधात महापालिकेचा, नगरसेवकांचा निषेध करीत, शनिवारी स्वाभिमानी विकास आघाडी, शहर सुधार समिती, मनसे यांच्यावतीने महापालिकेवर पायताण मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 20 - रस्ते हस्तांतरणाविरोधात महापालिकेचा, नगरसेवकांचा निषेध करीत, शनिवारी स्वाभिमानी विकास आघाडी, शहर सुधार समिती, मनसे यांच्यावतीने महापालिकेवर पायताण मोर्चा काढण्यात आला. नगरसेवकांविरोधात निषेधाच्या घोषणा देत बांगड्याही भेट म्हणून प्रवेशद्वाराला बांधण्यात आल्या. सांगलीच्या मित्रमंडळ चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. कापड पेठ, हरभट रोडमार्गे महापालिकेवर मोर्चा आला. याठिकाणी रस्ते हस्तांतरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
 
दारू दुकानांसोबत तडजोड करणा-या नगरसेवकांचा निषेधही करण्यात आला. निदर्शने करून महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला बांगड्या बांधल्या. प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यामुळे नगरसेवक, अधिका-यांना मागील दाराने महापालिकेत जावे लागले.
 
यावेळी नगरसेवक शेखर माने म्हणाले की, आमच्या आंदोलनाने ब-याचजणांची अडचण झाली आहे. जनतेची दारूबंदीची भावना असताना, काही पदाधिकारी आणि नगरसेवक रस्ते हस्तांतरण करून दारूवाल्यांना रान मोकळे करून देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू.
 
स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक गौतम पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा गैरवापर करीत काही नगरसेवक ऐनवेळी ठराव करण्याच्या प्रयत्नात आहेत. जोपर्यंत आम्ही सभागृहात आहोत, तोपर्यंत त्यांचे हे उद्योग चालू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दारू दुकाने सुरू होऊ देणार नाही.
 
मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले की, "राज्यात सर्वाधिक बदनाम झालेली ही महापालिका आहे. अनेक घोटाळे याठिकाणी घडले. जनतेच्या पैशाची वाट लावली गेली. आता यात रस्ते हस्तांतरणाच्या माध्यमातून ते भर टाकत आहेत".
आंदोलनात उपमहापौर विजय घाडगे, सतीश साखळकर, मनसेचे अशिष कोरी, शहर सुधार समितीचे रवींद्र चव्हाण आदी सहभागी झाले होते.
 
फटाक्यांची आतिषबाजी
महासभेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव झाला नसल्याचे गौतम पवार व शेखर माने यांनी आंदोलकांसमोर स्पष्ट केल्यानंतर महापालिकेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.