शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: September 20, 2016 02:03 IST

महापालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त झाला नसला, तरी अमेरिकेतील ओरॅकल कंपनी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पुढे सरसावली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त झाला नसला, तरी अमेरिकेतील ओरॅकल कंपनी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पुढे सरसावली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ओरॅकल या कंपनीशी महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करार झाला आहे. या करारात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जे काही प्रकल्प येतात ते राबविण्यासाठी आर्थिक मदत आणि अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका ओरॅकल कंपनीची असेल. यामध्ये पिंपरी-चिंचवडबरोबरच मीरा-भार्इंदर महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिकांचाही समावेश करण्यात आला आहे. शहरांना स्मार्ट बनविण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी राबविलेल्या स्मार्ट सिटी योजनेत सुरुवातीला देशभरातील १०० शहरांचा समावेश केला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराला चांगले गुण असतानाही योजनेतून शहराला वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर सर्व निकषांमध्ये बसत असतानाही शहराचा या योजनेत समावेश करण्यात न आल्याने पिंपरी-चिंचवडवर अन्याय झाल्याच्या भावना शहरवासीयांनी व्यक्त केल्या. याबाबत सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले. पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. त्यावेळी पुढील टप्प्यात शहराचा समावेश होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही समावेश झालेला नाही. शहराच्या विकासाला गती...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, तेथील ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जे काही प्रकल्प येतात ते राबविण्यासाठी आर्थिक मदत आणि अंमलबजावणीसाठी ओरॅकल कंपनी सहकार्य करणार आहे. त्यामुळे शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला नसला, तरी ओरॅकल कंपनीच्या माध्यमातून का होईना शहरात विविध योजना राबविल्या जातील. यामुळे शहराचा विकास साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)>मुख्यमंत्री : परदेशातून घोषणा