शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या खाटेवर आढळली अजगराची पिले

By admin | Updated: June 10, 2016 21:17 IST

कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेच राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले. या रुग्णालयात चक्क रुग्णांच्या खाटेवर अजगराची पिले आढळून आली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. १० -  कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेच राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले. या रुग्णालयात चक्क रुग्णांच्या खाटेवर अजगराची पिले आढळून आली. ही पिले पकडल्याजाईपर्यंत रुग्णांसह डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, या घटनेला घेऊन येथील रुग्ण किती सुरक्षित आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. या विभागात खाटेवर रुग्णांऐवजी दीड ते दोन फुटाची दोन अजगराची पिले वळवळताना एका परिचारिकेच्या नजरेस पडली. तिने लागलीच आरडाओरड केली. डॉक्टरांसह, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका कर्मचाऱ्याने सर्पमित्राला फोन करून बोलवून घेतले. सर्पमित्राने अत्यंत शिताफीने अजगराच्या दोन्ही पिल्लांना पकडून डबाबंद केले. सुदैवाने खाटांवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली.यापूर्वी रुग्णालय परिसरात विषारी साप निघाल्याची माहिती आहे. रुग्णालय परिसरात साप निघणे हे नेहमीचे झाले असले तरी अधिकारी लक्ष देत नसल्याचे येथील कर्मचारी सांगतात. विशेष म्हणजे, रात्रपाळीतील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक रात्रीला तळमजल्यावर झोपतात. यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पकडलेली दोन पिले ही सापाची नसून, अजगराची असल्याचे सर्पमित्राने सांगितले. रुग्ण धोक्यात...रुग्णालय परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे. कचऱ्याचा ढीगही साचलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षा भिंतीचे बांधकाम थंडबस्त्यात पडले होते ते आता सुरू झाले आहे. रुग्णालयाची दारे व खिडक्या जुनाट असून खिळखिळ्या झाल्या आहेत. मांजरीपासून कुत्र्याची पिले सहज रुग्णालयात प्रवेश करतात. आता अजगराची पिलेही येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. याला घेऊन रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. खडकीच्या फटींमधून आले असावे...रुग्णालयाच्या परिसरात झाडेझुडूपे आहेत. याच परिसरात संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे. यामुळे अजगराची पिले खिडकीच्या फटींमधून आली असावी. रुग्णांच्या सुरक्षेला घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. डॉ. मीना देशमुख वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय